सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांचे विधान

सहारनपूर (उत्तरप्रदेश) : काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी हुतात्मा क्रांतीकारक भगतसिंह आणि पॅलेस्टिनी आतंकवादी संघटना हमास हे एकसारखेच असल्याचे विधान केले. ‘दोघेही आपल्या मायभूमीसाठी लढले’, असे सांगून त्यांनी स्वतःच्या विधानाचे समर्थनही केले.
🚨 Congress MP Imran Masood shocks the nation!
💬 Equates Bhagat Singh with Hamas, calling them “freedom fighters”
⚡ Justifies Hamas killings, claims “Israel killed lakhs in return”
📺 When asked if he’s comparing Bhagat Singh to Hamas, replies “Yes”
🔥 Says India has no… pic.twitter.com/VPaEqoVwLf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 24, 2025
भाजपने मसूद यांच्यासह काँग्रेसवर टीका केली आहे. पत्रकार सुशांत सिन्हा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्रान मसूद यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर बोलत असतांना हे विधान केले.
Congress has finally stooped low enough to compare our hero Bhagat Singh with terrorist organization Hamas.
Congress MP Imran Masood who once threatened to ki!l PM Modi now says Hamas & Bhagat Singh are same.
This is what Rahul Gandhi & Congress think of our freedom fighters pic.twitter.com/2f3JaMKOj4
— Political Kida (@PoliticalKida) October 23, 2025
मुलाखतीत इम्रान मसूद यांनी दिलेली उत्तरे !
१. भारताला परराष्ट्र धोरणच नाही. पॅलेस्टाईनवर इस्रायलने आक्रमण केले, त्याचा आपण निषेध व्यक्त केला नाही. (इस्रायलने पॅलेस्टाईनवर का आक्रमण केले, हे मसूद का सांगत नाहीत ? ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर आक्रमण करून त्यांना ठार केले, तर २०० हून अधिक जणांचे अपहरण केले, त्यामुळे इस्रायलने आक्रमण केले, हे मसूद सांगत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
२. ‘हमास ही एक आतंकवादी संघटना आहे’, असे सिन्हा यांनी सांगताच इम्रान मसूद म्हणाले की, ‘भगतसिंह आतंकवादी होते का ?’ यानंतर मसूद यांना विचारले गेले, ‘तुम्ही हमास आणि भगतसिंह यांची तुलना करत आहात का ?’ या प्रश्नावरही त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.
३. इम्रान मसूद म्हणाले की, भगतसिंह मायभूमीसाठी लढले होते, त्याचप्रमाणे हमासही त्यांच्या मायभूमीसाठी लढत आहे. हमासने त्यांच्या स्वातंत्र्याचा लढा उभारला आहे. त्यांनी जो मार्ग निवडला आहे, त्यावरून वाईट वाटते. (हमास नाही, तर इस्रायल गेली ८० वर्षे स्वतःच्या मायभूमीसाठी लढा देत आहे. हाच २ सहस्र वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आहे. मसूद तो सांगत नाहीत. – संपादक)
४. ‘हमासने इस्रायलवर आक्रमण केल्यानंतर अनेकांना मारले. शेकडोंना ओलीस ठेवले. पॅलेस्टिनी नागरिकांची ढाल बनवून ते लढत आहेत, ते आतंकवादी नाहीत का ?’, असाही प्रश्न इम्रान मसूद यांना विचारण्यात आला. त्यावर इम्रान मसूद म्हणाले, ‘‘हमासने काही शेकडो लोकांना मारले; पण त्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने लाखाच्या आसपास लोकांना मारले. हे का पाहिले जात नाही ?’’ (हमासने आधी आक्रमण केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरात आक्रमण केले. त्यानंतरही हमासने ओलिसांची सुटका केली नाही. यामुळेच इस्रायलला युद्ध चालूच ठेवावे लागले. युद्धात सहस्रावधी लोक ठार होत असतांनाही हमासने ओलिसांची सुटका का केली नाही ? याचे उत्तर मसूद देतील का ? या लोकांच्या मृत्यूला इस्रायल नाही, तर हमासच उत्तरदायी आहे ! – संपादक)
५. सिन्हा यांनी इम्रान मसूद यांना मोहनदास गांधी यांच्याविषयी प्रश्न विचारला असता इम्रान मसूद यांनी सावध भूमिका घेत आम्ही अहिंसावादी लोक असल्याचे सांगितले. (हमासचे समर्थन करणारे म्हणजे अहिंसावादी ! – संपादक)
साम्यवादी आणि काँग्रेसचे नेते आतंकवाद्यांचे समर्थन करतात! – भाजप

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या मुलाखतीमधील इम्रान मसूद यांच्या विधानाचा एक व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. काँग्रेसवर टीका करतांना त्यांनी लिहिले की, साम्यवादी आणि काँग्रेसचे नेते आतंकवाद्यांचे समर्थन करतात. यापूर्वी कन्हैया कुमारने भगतसिंह यांची तुलना लालूप्रसाद यादव यांच्याशी केली होती. काँग्रेसने यापूर्वी अन्य महापुरूषांचाही असाच अवमान केला होता.
Boti Boti Imran Masood compares Hamas to Bhagat Singh ji
This is an insult of all freedom fighters
Left & Congress eulogise terror groups and undermine all our heroes to make Gandhis look great
Earlier Kanhaiya Kumar compared Bhagat Singh ji to Lalu Yadav!
This isn’t the… pic.twitter.com/egTxpGjfG6
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) October 23, 2025
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !