Hindu Brothers Attacked : भावनगर (गुजरात) येथे मशिदीजवळ फटाके फोडण्यावरून मुसलमानांकडून हिंदु तरुणांवर प्राणघातक आक्रमण

समीर आणि असलम यांना अटक

अटक करण्यात आलेले आरोपी (डावीकडे)

भावनगर (गुजरात) – येथे दिवाळीच्या दिवशी मशिदीजवळ फटाके फोडण्यावरून २ हिंदु भावांवर मुसलमान तरुणांनी प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी समीर, रियाज आणि असलम यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यातील समीर अन् असलम यांना अटक केली. ही घटना कुंभारवाडा परिसरातील मढिया रोडवरील महंमदी मशिदीजवळील माफनगर भागात १९ ऑक्टोबर या दिवशी घडली.

२-३ मुसलमान तरुण एका हिंदु तरुणाला फटाके फोडल्यावरून शिवीगाळ करत होते. त्याचा भाऊ तेथे पोचल्यावर त्याच्यावरही आक्रमण करण्यात आले. भावाने सांगितले की, रियाज पठाण, समीर हुसेन सय्यद आणि असलम पठाण हे हातात पाईप अन् तलवारी घेऊन उभे होते. असलम पठाणने शिवीगाळ केल्यावर त्याला आक्षेप घेतल्यामुळे  रियाज पठाणने पाईपने डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर समीर आणि असलम यांनीही पाईपने मारहाण केली. त्याचा भाऊ त्याला वाचवायला गेला; मात्र आरोपींनी त्याच्यावरही आक्रमण केले. समीर नावाचा आरोपी तलवार घेऊन आला आणि त्याने भावाच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर भांडण वाढले आणि मित्रांनी येऊन दोन्ही भावांना वाचवले. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार चालू आहेत.

काँग्रेसच्या महिला नेत्याचा सहभाग असूनही पोलिसांनी कारवाई केली नाही ! – पीडितांचा आरोप

पीडित तरुणाने पोलिसांवर पक्षपाती वर्तनाचा आरोप केला आहे. त्याचा दावा आहे की, ज्या आरोपींची नावे त्याने तक्रारीत दिली आहेत, त्यांच्या विरोधात पोलिसांनी काहीही केलेले नाही. खतीजा खातून नावाची एक स्थानिक काँग्रेस नेत्याही आक्रमणात सहभागी होती आणि ती त्या भागातील पक्षाच्या कार्यक्रमांचे आयोजन करते. (भाजप राज्यात असे होऊ नये, हीच अपेक्षा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गुजरातमध्ये अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !