कर्नाटक उच्च न्यायालयाने अनुमती नाकारणार्या संघद्वेषी काँग्रेस सरकारला दिला झटका

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चित्तपूर येथे २ नोव्हेंबर या दिवशी संचलन करण्याची अनुमती दिली आहे. या संचलनाला प्रशासनाने अनुमती नाकारली होती. त्याविरोधात कलबुर्गी येथील संघाचे संयोजक अशोक पाटील यांनी याचिका प्रविष्ट केली होती.
१. प्रशासनाने सांगितले होते की, संचलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; कारण त्याच वेळी, त्याच ठिकाणी ‘भीम आर्मी’ आणि ‘भारतीय दलित पँथर’ या संघटनांनीही फेरी काढण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यांनाही अनुमती देण्यात आलेली नव्हती.
२. यावर पाटील यांच्या अधिवक्त्याने सांगितले की, अधिकार्यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांची उत्तरे देण्यात आली आहेत आणि राज्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे कार्यक्रम पूर्ण शांततेत पार पडले आहेत.
३. याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले, ‘सर्व संघटनांना अनुमती घेणे आवश्यक आहे, एवढेच सांगितले आहे. हा नियम तर भाजप सरकारच्या काळात, म्हणजेच मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या कार्यकाळातच लागू झाला होता, आम्ही तो केवळ पुनरुच्चारित केला आहे. तेव्हा भाजपने त्यावर विरोध का केला नाही ?’ (संघाने अनुमती घेण्याचाच प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने अनुमती नाकारली, अशी घटना असतांना हास्यास्पद उत्तर देणारे मुख्यमंत्री काय कारभार करत असतील, हे लक्षात येते ! – संपादक)
🚩 Victory of Dharma & Constitution!
Kalaburagi HC CANCELS the Tahsildar’s illegal ban on the RSS flag procession in Priyanka Kharge’s constituency & GRANTS permission.
Unconstitutional powers defeated.
Justice served. 💪#RSS #KalaburagiHC #Constitution #DharmaWins https://t.co/jw8tlx4Mbr pic.twitter.com/TfPLxRheSx
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) October 19, 2025
संपादकीय भूमिकासंघद्वेषाच्या आधारे काँग्रेस पुरो(अघो)गामी आणि मुसलमान यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत असते, तरी देशातील जनतेने तिला सत्ताच्युत केले आहे, हे तिला अद्याप उमगलेले नाही अन् ती परत परत तेच करण्याचा प्रयत्न करते ! |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !