भारतीय आस्थापनांना मोठा फटका बसण्याची शक्यता

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणार्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने तब्बल २०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क अर्थात् टॅरिफ लादण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगातील औषध निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्या भारताच्या औषध उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक ऑगस्ट २०२६ पासून हे नवीन धोरण लागू केले जाणार आहे. पहिली २ वर्षे (वर्ष २०२६-२०२८) अमेरिकेत आयात होणार्या सर्व जेनेरिक औषधांवर शून्य टक्के शुल्क राहील. तिसर्या वर्षी (वर्ष २०२८-२९) जेनेरिक औषधांवरील आयात शुल्क थेट १०० टक्के केले जाईल, तर चौथ्या वर्षी (वर्ष २०२९ नंतर) हे शुल्क वाढवून २०० टक्के केले जाईल, अशी माहिती ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर एक पोस्ट करत दिली.
अमेरिकेत जेनेरिक औषधांचे उत्पादन पुन्हा चालू होण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेत जेनेरिक औषधांचे उत्पादन पुन्हा चालू व्हावे, हाच या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. ज्या आस्थापनांना दिलेल्या समयमर्यादेत अमेरिकेत त्यांचे प्रकल्प आणि यंत्रसामुग्री उभारणार नाहीत, त्यांना हा दंड सहन करावा लागेल. अमेरिकी जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतावर काय परिणाम होणार ?
अमेरिकेत वापरल्या जाणार्या एकूण जेनेरिक औषधांपैकी साधारण ४० टक्के औषधे एकट्या भारतातून पुरवली जातात. अमेरिकेत उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, नैराश्य, संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्य यांसाठी भारतीय जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आयात शुल्कातून वाचण्यासाठी भारतीय औषध निर्मात्यांना आता अमेरिकेतच त्यांचे उत्पादन प्रकल्प उभारावे लागतील किंवा अमेरिकी बाजारातील औषधांच्या किमती प्रचंड वाढवाव्या लागतील. यामुळे थेट अमेरिकी ग्राहकांच्या खिशावरही ताण पडू शकतो.
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !
Indian In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला