९० ग्रॅमच्या ‘सर्फ एक्सल’च्या पाकिटात केवळ ७० ग्रॅम पावडर !

डेहराडून (उत्तराखंड) – ‘उत्तराखंड राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगा’ने ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ या आस्थापनाला पाकिटावर ९० ग्रॅम वजन छापून प्रत्यक्षात ७० ग्रॅम ‘डिटर्जंट पावडर’ विकल्याच्या प्रकरणी दोषी ठरवून ग्राहकाला ५० सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.
90-gram 'Surf Excel' pack found to contain only 70 grams of detergent! ⚠️
Hindustan Unilever Ltd. has been directed to pay ₹50,000 in compensation to the consumer.
Why did government regulators fail to detect this? Was it overlooked? Authorities must act proactively,… pic.twitter.com/D8ASTsduQm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2026
सप्टेंबर २०२० ममध्ये नैनिताल जिल्ह्यातील रामनगर येथील रहिवासी ज्ञानचंद्र गर्ग यांनी ५१२ रुपयांना ‘सर्फ एक्सेल इडब्ल्यू’चा एक खोका खरेदी केला होता. जेव्हा त्यांनी यातील पाकिटांचे वजन केले, तेव्हा पाकिटावर ९० ग्रॅम लिहिलेले असतांना प्रत्यक्षात त्यात ७० ग्रॅम डिटर्जंट आढळले. या फसवणुकीविरुद्ध त्यांनी आधी आस्थापनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि नंतर ‘नैनिताल जिल्हा ग्राहक मंचा’कडे तक्रार करून १ लाख रुपये भरपाईची मागणी केली. जिल्हा मंचाच्या सुनावणीच्या वेळी आस्थापनाच्या अधिवक्त्यांच्या उपस्थितीत जेव्हा ते सीलबंद पाकीट इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजण्यात आले, तेव्हा त्याचे वजन ७० ग्रॅमच भरले. यावर आस्थापनाचे अधिवक्ता कोणताही आक्षेप घेऊ शकले नाहीत.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !