Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकिस्तानी आतंकवाद्यांना आश्रय देणारा आणि साहाय्य करणारा महंमद रफिक नाईक याला पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू (छातरू) येथून अटक केली. आरोपी महंमद हा कलासोई भागातील एका मशिदीत मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) म्हणून काम करत होता. तो ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर सैफुल्ला याच्या नेतृत्वाखालील ‘सैफुल्ला ग्रुप’चे काम हाताळत होता.

१. किश्तवाडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नरेश सिंह यांनी सांगितले की, आरोपी महंमद  रफिक नाईक याने पाकिस्तानी आतंकवादी कमांडर सैफुल्ला आणि त्याच्या साथीदारांना सुरक्षित आश्रय, अन्न, आवश्यक सामान आणि आपापसांतील समन्वय, यांसाठी साहाय्य पुरवले होते.

२. या मौलवीच्या साहाय्यामुळेच आतंकवादी जवळपास २ वर्षे छात्रूच्या जंगलात लपून राहिले. सुरक्षादलांनी नंतर एक मोठी मोहीम राबवून सैफुल्ला आणि त्याच्या गटातील ७ आतंकवाद्यांना चकमकीत ठार मारले.

३. रफिक नाईकच्या अटकेपूर्वी पोलिसांनी याच प्रकरणात मुनीर अहमद आणि मश्कूर अहमद यांनाही अटक केली होती. त्यांच्यावर आतंकवादी गटाला रसद आणि दळणवळण यांवषयीचे साहाय्य केल्याचा आरोप होता.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये हा प्रकार नवा नाही; परंतु गेल्या ७८ वर्षांत कुठल्याही सरकारने असे कृत्य करणार्‍या एकालाही देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा न दिल्यानेच असे कृत्य करण्यास धजावतात. सरकारला हे लज्जास्पद !