सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रातून प्रामुख्याने आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे (ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे) महान कार्य करत आहेत. गुरुदेवांच्या देवघरात सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे ठेवलेली आहेत. देवघरातील देवतांना ते प्रतिदिन भक्तीपूर्ण प्रार्थना करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान समष्टी कार्यात देवदेवता गुरुदेवांना साहाय्य करतात.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

गुरुदेवांमधील भक्तीमुळे देवतांच्या चित्रांत सूक्ष्मातून झालेले चांगले पालट स्थुलातूनही दिसून येतात. देवतांच्या चित्रांतील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्पंदनांच्या प्रमाणातही पालट झाले आहेत. या लेखातून आपण गुरुदेवांच्या देवघरातील सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये समजून घेऊया. आधी खाली दिलेल्या छायाचित्रांचा सूक्ष्म-प्रयोग करावा.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे (ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे) महान कार्य करत आहेत. गुरुदेवांच्या देवघरात सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे ठेवलेली आहेत. देवघरातील देवतांना ते प्रतिदिन भक्तीपूर्ण प्रार्थना करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान समष्टी कार्यात देवदेवता गुरुदेवांना साहाय्य करतात. गुरुदेवांमधील भक्तीमुळे देवतांच्या चित्रांत सूक्ष्मातून झालेले चांगले पालट स्थुलातूनही दिसून येतात. देवतांच्या चित्रांतील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्पंदनांच्या प्रमाणातही पालट झाले आहेत. या लेखातून आपण गुरुदेवांच्या देवघरातील सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्राची आध्यात्मिक वैशिष्ट्ये समजून घेऊया. आधी बाजूला दिलेल्या छायाचित्रांचा सूक्ष्म-प्रयोग करावा.

२. सूक्ष्म-प्रयोगाचे उत्तर

श्रीकृष्णाच्या मूळ चित्राकडे पाहून प्रामुख्याने भाव आणि चैतन्य यांची स्पंदने जाणवतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून प्रामुख्याने आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवतात.

सूक्ष्म ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्रावर निळसर छटा येणे

‘हिंदु राष्ट्र लवकरात लवकर यावे’, यासाठी गुरुदेव अत्यंत तळमळीने देवतांना प्रार्थना करतात. गुरुदेवांच्या देवाप्रती असलेल्या भक्तीभावामुळे त्यांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्रात चांगले पालट झाले आहेत. चित्रावर निळसर छटा आली आहे. भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. गुरुदेवांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्रावर निळसर छटा येणे, हे काळानुसार चित्रातील श्रीविष्णुतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्याचे द्योतक आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.४.२०२५)

४. सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे मूळ चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाचे चित्र यांतील विविध स्पंदनांचे प्रमाण (टक्के)

खालील सारणीच्या आधारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्राच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात येतात –

सौ. मधुरा धनंजय कर्वे

४ अ. श्रीकृष्णाचे चित्र उच्च स्तरावर गेलेले असणे : श्रीकृष्णाच्या मूळ चित्रात भाव आणि चैतन्य ही स्पंदने अधिक प्रमाणात आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्रात आनंद आणि शांती ही स्पंदने अधिक प्रमाणात आहेत. आनंद आणि शांती ही स्पंदने भाव अन् चैतन्य या स्पंदनांपेक्षा उच्च आणि अधिक निर्गुण स्तराची आहेत. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाचे चित्र उच्च स्तरावर गेले असून त्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली आहे.

४ आ. श्रीकृष्णाचे चित्र थोड्या प्रमाणात निर्गुण स्तरावर गेले असल्याने ते किंचित फिकट आणि अस्पष्ट दिसणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्रातील आनंद आणि शांती ही स्पंदने वाढल्याने ते चित्र थोड्या प्रमाणात निर्गुण स्तरावर गेले आहे. त्यामुळे ते मूळ चित्राच्या तुलनेत किंचित फिकट आणि अस्पष्ट दिसते.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.४.२०२५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक