
सातारा, २९ सप्टेंबर (वार्ता.) – सामाजिक माध्यमांवर काही मुसलमान तरुणांनी ‘आय लव्ह महंमद’ अभियान चालू केले होते. हा प्रचार अनेक ठिकाणी तणाव वाढवत आहे. त्याला प्रतिसाद म्हणून काही हिंदु तरुणांनी शांततेच्या मार्गाने ‘आय लव्ह महादेव’ असे लिहिलेली भित्तीपत्रके आणि व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्यास चालू केले; मात्र काही राज्यांत या लोकशाहीवादी प्रतिक्रियेला हिंसक उत्तर दिले गेले. गुजरातमध्ये गरबा खेळणार्या हिंदूंवर ‘आय लव्ह महादेव’ मोहिमेच्या रागातून धर्मांधांच्या जमावाने आक्रमण केले. या आक्रमणात दगडफेक, जाळपोळ आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेची हानी करण्यात आली. आक्रमणकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांसह काही गाड्या जाळल्या. त्यामुळे हिंदु सणांच्या वेळी सतत जाणीवपूर्वक दंगली घडवण्याच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एन्.एस्.ए.) आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यू.ए.पी.ए.) अंतर्गत कठोर कारवाई करा, अशी मागणी ‘अखिल भारतीय हिंदु महासभे’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दतात्रय सणस यांनी केली.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनाला नाथ संप्रदायाचे पू. सोमनाथगिरी महाराज उपाख्य दादा महाराज कुंभार यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पाटीदार समाजाचे जयंतीभाई पटेल, अधिवक्ता धनंजय चव्हाण, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, श्री. सुरेश पंडित, श्री. सुनील लोंढे, श्री. राजेंद्र सांभारे, सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम, श्री. शंकर पवार, ‘इस्कॉन’चे श्री. प्रवीण रसाळ आदि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी आंदोलनाला संबोधित केले. आंदोलनानंतर एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी गेले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे, कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथे धर्मांधांनी बळजोरीने हिंदूंच्या घरांवर ‘आय लव्ह महंमद’ चे फलक लावले. याला विरोध करणार्या हिंदु महिला आणि पुरुष यांना घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केले. यामध्ये अनेक जण घायाळ झाले. ही आक्रमणे केवळ गुजरात किंवा कर्नाटकपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून चालू झालेला हा वाद आता महाराष्ट्र, तेलंगाणा, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही पसरत आहे. या घटनांमुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. धर्मांधांकडून हिंदु सणांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. प्रत्येक वर्षी हिंदु नववर्ष, श्रीरामनवमी, हनुमान जयंती, होळी, रंगपंचमी, गणेशोत्सव, दसरा किंवा दिवाळी यांसारख्या हिंदु सणांच्या वेळी धर्मांध मुसलमान काही ना काही कारण काढून हिंदूंच्या मिरवणुकांवर आणि उत्सवांवर दगडफेक करतात, जाळपोळ करतात आणि दंगली घडवतात. या घटनांमधून हिंदू समाजात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. या दंगली आणि आक्रमणे केवळ काही लोकांच्या रागातून घडत नाहीत, तर त्यामागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याची शक्यता आहे. या हिंसाचाराला चिथावणी देणारे सूत्रधार कोण आहेत? या कृत्यांसाठी तरुणांना भडकवणारे धर्मगुरू कोण आहेत? कोणत्या मशिदी आणि मदरशांमधून असे हिंसक फतवे काढले जातात? या संघटनांना मिळणारा आर्थिक आणि राजकीय पाठिंबा कोठून येतो? याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
| या आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व अन्य राज्यांमधील हल्लेखोरांना आणि त्यांच्या सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची हानीभरपाई हल्लेखोरांकडून वसूल करण्यात यावी. हे धोरण नागपूर दंगलीच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी आखले आहे. अशी कारवाई उत्तर प्रदेशातही होते. ज्या मशिदी आणि मदरशे तसेच मुल्ला-मौलवी यांच्याद्वारे द्वेषपूर्ण आणि हिंसक शिकवण दिली जाते, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. |
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation