बंदी घालणार्या अधिकार्यांवर कारवाई कधी होणार ? - रमेश शिंदे
हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या धर्मलढ्याला मोठे यश !

पुणे – पुण्यातील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी शासनाने मागे घेतली. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्व विभाग, पोलीस प्रशासन अन् पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदने देऊन ही बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली होती. या संघटित प्रयत्नांमुळे मोठे यश आले असून प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.
🚩 Huge Victory! Pune's Mahatma Phule Wada Vat Purnima puja ban lifted after strong protests by @HinduJagrutiOrg & Hindutva groups
Shri @Ramesh_HJS called the ban a 'Tughlaqi' assault on religious freedom & thanked the govt, while demanding strict action against the anti-Hindu… pic.twitter.com/q9I9rAwdmO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2026
पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांचे पोलिसांना पत्र !
हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन आणि मागण्या यांची नोंद घेत पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले की, महात्मा फुले वाडा हे स्मारक राज्य संरक्षित घोषित होण्याअगोदरच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा आणि चालीरिती यांची सद्यःस्थिती कायम ठेवावी. वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की,

१. बंदीचा प्रकार म्हणजे हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरील आघात आहे.
२. या वटवृक्षाच्या ठिकाणी वटसावित्री व्रताचे चालू असलेले पारंपरिक पूजन बंद करण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व विभागाने दिला होता. हिंदु जनजागृती समितीने केलेला विरोध आणि अधिवक्त्यांनी दिलेली कायदेशीर नोटीस, यांमुळे त्यांना लोकशाहीची जाणीव झाली अन् ‘भारतात धर्मस्वातंत्र्य आहे’, हे मान्य करून त्यांनी तुघलकी आदेश मागे घेतला.
३. फडणवीस सरकारचे यासाठी अभिनंदन; मात्र या प्रकरणात सरकारने हिंदूंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करणार्या, तसेच पुरातत्व विभागाच्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करून त्यांना सध्या महाराष्ट्रात असा तुघलकी कारभार चालणार नसल्याचे लक्षात आणून द्यावे, अशी सरकारकडे मागणी आहे.
🚩 Ban on Vat Pujan at Mahatma Phule Wada Revoked!
A major victory for Hindu Janajagruti Samiti and other pro-Hindutva organizations! ✨📜 The Maharashtra Government has revoked the ban on the traditional Vat Pujan at Pune's historic Mahatma Phule Wada after strong public… pic.twitter.com/tjift8F8Md
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 26, 2026
या यशानंतर समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी आवाहन केले की,
अधिकाधिक हिंदु महिलांनी महात्मा फुले वाडा येथे जमून उत्साहात वटवृक्षाचे पूजन करावे आणि आपली धार्मिक परंपरा जपून या विजयाचा आनंद साजरा करावा.
|

पुणे – गंज पेठेतील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ स्मारकाच्या परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी हा हिंदु महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आघात आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या शिष्टमंडळाने पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन ही बंदी त्वरित उठवण्याची मागणी केली. या विषयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहणे यांना देण्यात आले. या वेळी समितीचे प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !