|

नवी देहली – परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांनी अलीकडेच सायप्रसच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार सायप्रस वाद सोडवण्यावर चर्चा केली, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत दिली. वर्ष १९७४ मध्ये तुर्कीयेने उत्तर सायप्रसवर अवैध नियंत्रण मिळवले आहे. तेव्हापासून वाद आहे. जयशंकर यांच्या भेटीच्या २ दिवस आधी तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते. ‘काश्मीर सूत्रावर आमची भूमिका गेल्या १० वर्षांपासून पूर्णपणे स्पष्ट आहे’, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Delhi | MEA Official Spokesperson Randhir Jaiswal says, "Our statement on Kashmir is clear. Everyone is aware of our position over the last 10 years… Regarding North Cyprus, our Foreign Minister met with the Cyprus Foreign Minister… The Foreign Minister stated that… pic.twitter.com/MdBvzfyMN6
— ANI (@ANI) September 26, 2025
‘नाटो’ प्रमुखांचे विधान भारताने फेटाळले !
‘पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन युद्धाच्या सूत्रावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती’, हे ‘नाटो’ (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) संघटनेचे प्रमुख मार्क रुट्टे यांचे विधान जयस्वाल यांनी या वेळी पूर्णपणे फेटाळून लावले. ते म्हणाले की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ‘नाटो’ला त्यांच्या निवेदनात सावधगिरी बाळगली पाहिजे.
#WATCH | Delhi | MEA Official Spokesperson Randhir Jaiswal says, "We have seen the statement by NATO Secretary General Mark Rutte regarding a purported phone conversation between Prime Minister Narendra Modi of India and President Vladimir Putin of Russia. This statement is… pic.twitter.com/cuWzj3SeoB
— ANI (@ANI) September 26, 2025
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !