चिनी इंटरनेटद्वारे होणार संचालित
चीनला मिळणार भारताच्या सीमेवरील माहिती
१० किलोमीटरपर्यंतच्या हालचाली चित्रित करण्याची क्षमता

पिथौरागड (उत्तराखंड) – नेपाळने उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेवर चीननिर्मित ‘थर्मल कॅमेरे’ (उष्णतेमुळे वस्तूंमधून निघणारी इन्फ्रारेड किरणे ओळखून त्यांचे तापमान चित्राच्या स्वरूपात दाखवणारा कॅमेरा) बसवायला चालू केले आहे. हे कॅमेरे भारतीय सीमेच्या आत अनुमाने १० किलोमीटरपर्यंतच्या हालचाली चित्रित करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. याखेरीज या कॅमेर्यांच्या कार्यान्वयनासाठी चीनच्या इंटरनेटचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे. याचा अर्थ भारतीय सीमेची माहिती थेट चीनला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात सुमारे २७५ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या सीमेच्या सुरक्षेचे दायित्व भारताकडून सशस्त्र सीमा दल आणि नेपाळकडून ‘आर्म्ड पोलीस फोर्स’ यांच्यावर आहे.
दिवस आणि रात्र दोन्ही वेळी लांब अंतरावरील हालचालींवर लक्ष ठेवण्याची थर्मल कॅमेर्यांची क्षमता असते. सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे की, जर या पाळत ठेवणार्या प्रणालीचा डेटा (माहिती) चीनच्या सर्व्हर किंवा नेटवर्कमधून जात असेल, तर भारतीय सीमा क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. यामुळेच या प्रकल्पाला केवळ सीमा सुरक्षा नव्हे, तर प्रादेशिक सामरिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
चीनचे कॅमेरे चिंतेचा विषय ! – निवृत्त सैन्याधिकारी
निवृत्त लेफ्टनंट कर्नल एस्.पी. गुलेरिया यांचे म्हणणे आहे की, भारत-नेपाळ संबंध ऐतिहासिकदृष्ट्या खूप भक्कम राहिले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमा असूनही कठोर पाळत ठेवण्याच्या व्यवस्थेची विशेष आवश्यकता कधीच भासली नाही; मात्र अलीकडच्या वर्षांत नेपाळ सीमाभागात सुरक्षा व्यवस्था भक्कम करत असतांना चीनच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असणे, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सीमाभागात स्थापित केलेल्या पाळत ठेवणार्या उपकरणांची तांत्रिक क्षमता आणि त्यांच्या माहिती जाळ्याचे मूल्यांकन सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जर कॅमेर्यांचे संचालन खरोखरच चिनी नेटवर्कद्वारे होत असेल, तर यामुळे सीमाभागाशी संबंधित संवेदनशील माहितीच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होऊ शकतात.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार