पुणे येथील विषारी दारू प्रकरण

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती यांच्याशी निलंबित केलेल्या ४ पोलीस कर्मचार्यांनी १५० वेळा भ्रमणभाषवरून संपर्क केल्याचे अन्वेषणातून समोर आले. (अशा पोलिसांना बडतर्फ करा ! – संपादक) त्यामुळे प्रजापतीच्या दारू व्यवसायास पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रजापती यांना अटक केल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषसह इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी चालू आहे. विषारी दारू प्राशन करून मृत्यू पावलेल्यांची संख्या २२ वर पोचली आहे.
उरुळीकांचन पोलीस ठाण्यातील अजित काळे, सुमित वाघ, यवत पोलीस ठाण्यातील रामदास जगताप आणि सुभाष डोईफोडे अशी निलंबित पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !