
मुंबई – इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय त्यांच्या शिवराज्यभिषेकदिनाच्या दिवशी घेण्यात आला. मुंबईतील इस्रायलचे वाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुतळा उभारणीच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करत राज्यशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
🚩 A proud moment for every Hindu!
🇮🇳🤝🇮🇱 Israel (@israelinMumbai) announces plans to install a grand statue of Chhatrapati Shivaji Maharaj to honor his legendary military strategy.
This project honors the historical links between Maharashtra and the Indian Jewish community.… pic.twitter.com/JFe9o8SkqV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
‘इस्रायलकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. हा पुतळा भारत आणि इस्रायल यांच्यातील दृढ मैत्रीचे, तसेच सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक ठरेल’, असे रेवाच यांनी या वेळी म्हटले.
या वेळी छत्रपती शिवरायांवरील साहित्य आणि चरित्रग्रंथ यांचे हिब्रू भाषेत भाषांतर करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे इस्रायलमधील नागरिकांना शिवरायांचे कार्य, विचार आणि इतिहास जाणून घेता येईल.

मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी ‘एक्स’द्वारे पोस्ट करून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ! शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इस्रायल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केल्यासाठी इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांचे मनापासून आभार ! छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे संपूर्ण सहकार्य करील. जय भवानी, जय शिवाजी !’’
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !