‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स’च्या सत्यशोधन अहवालातून धक्कादायक वस्तूस्थिती समोर !
धर्मांधांच्या जाळ्याला पाठीशी घालण्याचा अन् गुन्हा दाबण्याचा पोलिसांचा डाव !
अमरावती येथील भीषण ‘सेक्स स्कँडल’ (लैंगिक गैरप्रकार) प्रकरण

नागपूर – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा (अचलपूर) येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक आणि क्रूर अशा लैंगिक शोषण प्रकरणी अन्वेषण संथ ठेवण्यासाठी आणि हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपींकडून १० लाख रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप स्थानिक हिंदु संघटनांनी केला आहे. या भीषण अत्याचाराला वाचा फोडणारे सामाजिक कार्यकर्ते अन् पीडित हिंदु कुटुंब यांना सातत्याने धमकावले जात आहे. पोलिसांकडून पीडित आणि कार्यकर्ते यांना कोणतीही ठोस सुरक्षा पुरवली जात नाही, त्यामुळे पीडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंदु संघटनांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, पोलिसांनी या भागातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याऐवजी उलट आरोपींनाच पाठीशी घालणारी आणि त्यांना वाचवणारी भूमिका घेतल्याने त्यांची उच्चस्तरीय निष्पक्ष न्यायिक चौकशी झाली पाहिजे.
मुख्य आरोपी अयान अहमद अन् त्याच्या संघटित जाळ्याच्या ‘आयफोन’मधून तब्बल १ लाख ३० सहस्र छायाचित्रे आणि गंभीर डिजिटल पुरावे जप्त होऊनही पोलिसांनी या प्रकरणाला केवळ एक ‘सायबर गुन्हा’ म्हणून दाखवले आहे. ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ’च्या सत्यशोधन समितीने या संदर्भातील सत्यता सांगणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून वरीलप्रमाणे अन्यही काही गोष्टी समोर आल्या आहेत.
पोलिसांकडून अक्षम्य दिरंगाई !
१. छायाचित्रे आणि डिजिटल सामुग्री न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून मिळवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मुख्य आरोपीच्या आयफोनमधील लाखांहून अधिक तांत्रिक अन्वेषणात कमालीची दिरंगाई केली जात असून अद्याप सर्व सामुग्रीचे विश्लेषण पूर्ण करण्यात आलेले नाही.
२. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रणाची आवश्यक पडताळणी करण्यात आलेली नाही.
३. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानुसार या जिहादी चक्रव्यूहात अडकलेल्या पीडित मुलींची संख्या अनुमाने १८० च्या आसपास असूनही पोलिसांना आतापर्यंत केवळ ८ पीडित मुलींची ओळख पटवली आहे. त्यामुळे पोलिसांच्या हेतूवर शंका घेतली जात आहे.
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) बसस्थानकावर अपुर्या फलाटांमुळे प्रवाशांचे हाल !
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !