Santa Claus In Dandiya : ‘ॲक्सिस बँक’ने केले नवरात्रीचे ख्रिस्तीकरण : दांडियाच्या कार्यक्रमात दाखवला ‘सांता क्लॉज’ !

नवरात्रीपासून नाताळापर्यंत बँकेचे अनेक आकर्षक उपक्रम (ऑफर) असल्याचा दिला संदेश !

‘ॲक्सिस बँक’ने केले नवरात्रीचे ख्रिस्तीकरण

नवी देहली – भारतातील प्रसिद्ध अधिकोष असलेल्या ‘ॲक्सिस बँके’ने हिंदूंच्या नवरात्रोत्सवाच्या ख्रिस्तीकरणाचा प्रयत्न चालवला आहे. बँकेने त्याच्या सामाजिक माध्यमाच्या व्हिडिओत (‘रील’मध्ये) नवरात्रीतील दांडियाच्या कार्यक्रमात उत्सवाच्या मध्यभागी सांता क्लॉज दाखवला आहे. तसेच त्याच्या हातामध्ये दांडियाच्या काठ्याही देण्यात आल्या आहेत. ‘अ‍ॅक्सिस बँकेच्या ‘ऑफर’ नवरात्रीपासून नाताळापर्यंत चालू रहातील’, अशा स्वरूपाचा संदेश त्यातून देण्यात आला आहे. याला हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तथापि अजूनतरी बँकेने यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिल्याचे समोर आलेले नाही.Santa Claus In Dandiya

काही बोलक्या प्रतिक्रिया !

१. ‘ॲक्सिस बँके’ने नवरात्रोत्सवाचा हा अनादर रोखला नाही, तर मी बँकेत असलेली माझी ४ खाती बंद करून टाकीन ! – श्री. संजय दीक्षित, माजी प्रशासकीय अधिकारी आणि ‘द जयपूर डायलॉग्ज’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक

२. हा कशा प्रकारचा विनोद आहे ? तुमच्या मर्यादेत रहायला शिका. स्वत:च्या लाभासाठी आमच्या सणांचा अपलाभ उठवू नका ! – रितु प्रिया

३. अशा प्रकारचे विज्ञापन ईद अथवा मुसलमान यांच्यासंदर्भात बनवले जाऊ शकते का ? – वैशाली मिश्रा

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्माचा अशा प्रकारे अवमान करणार्‍या ‘ॲक्सिस बँके’चा निषेध ! या भारतीय बँकेच्या लक्षावधी खातेधारकांपैकी हिंदूच बहुसंख्य आहेत. त्यामुळे आता हिंदूंनी या विज्ञापनावरून बँकेला जाब विचारला पाहिजे !
  • हिंदु सणांचे एकप्रकारे केलेले हे निधर्मीकरण आहे. कट्टर ख्रिस्ती धर्मीय हिंदूंच्या उत्सवातील प्रसाद कदापि खात नाहीत. असे असतांना सांता क्लॉजला देवीचा प्रसाद खातांना दाखवण्याचे धारिष्ट्य बँक का दाखवत नाही ?