|

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि पाकिस्तान यांना एकत्र आणण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही, तसेच काश्मीरच्या सूत्रावर आम्ही मध्यस्थी करण्याच्या विचारातही नाही. हेच आमचे दीर्घकालीन धोरण आहे. काश्मीर हे भारत आणि पाकिस्तान यांचे आपापसांतील सूत्र आहे; परंतु कुणाला आमच्याकडून साहाय्याची अपेक्षा असल्यास आम्ही साहाय्य करण्यास सिद्ध आहोत. ट्रम्प यांच्यासमोर सध्या अन्य अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे काश्मीर सूत्र भारत आणि पाकिस्तान मिळून सोडवतील, असे वक्तव्य अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकार्याने केले. भारत आणि अमेरिका यांच्यात रशियाकडून केल्या जाणार्या ऊर्जा खरेदीच्या संदर्भात सकारात्मक चर्चा चालू असल्याच्या वृत्ताला या अधिकार्याने दुजोरा दिला आहे.
🇺🇸 US refuses mediation on Kashmir
❌ “No plans to mediate. Kashmir is a bilateral issue between India and Pakistan,” said a top US official.
🤝 “We’ll assist only if asked.”📉 Clear shift: US walking back on earlier Kashmir remarks.
💡 Why now? India-US talks on Russian oil… pic.twitter.com/SAKUJuUqur
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 25, 2025
अमेरिकेने भारतावर लादलेले ५० टक्के आयात शुल्क आणि ‘एच्-१ बी’ व्हिसाचे वाढीव शुल्क, यांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही देशांतील संबंध पूर्ववत् होण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयी अमेरिकेच्या एका अधिकार्याने म्हटले आहे की, ‘मोदी आणि ट्रम्प लवकरच भेटतील. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. आम्ही सध्या ‘क्वाड समिट’च्या आयोजनावर काम करत आहोत. या वर्षीच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षीच्या आरंभी नवी देहली येथे ही परिषद पार पडेल. भारत-अमेरिकेचे संबंध पूर्वपदावर येत आहेत. लवकरच आपल्याला सकारात्मक घडामोडी पहायला मिळतील.’
संपादकीय भूमिकामिनिटा मिनिटाला शब्द फिरवणार्या अमेरिकेवर कोण विश्वास ठेवणार ? भारताने अमेरिकेकडून पुन्हा तेलखरेदी करावी, यासाठी भारताला खूश करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रचलेला हा बनाव आहे, हे उघड आहे ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !