
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असणार आहे. येथे विजयादशमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
🪔 RSS begins its centenary year celebrations with #Vijayadashami in Nagpur.🚩
For the first time, 3 simultaneous route marches (Pathasanchalan) will be held on Sept 27 as part of the celebrations.#RSS100Years
Video courtesy; @eOrganiser pic.twitter.com/CLINXM5I2b— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 22, 2025
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाच्या वेळी प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत.
पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद जी तथा सरसंघचालक जी की उपस्थिति में होगा शताब्दी वर्ष का शुभारम्भ: https://t.co/UtM4xeiCeS
— RSS (@RSSorg) September 22, 2025
२७ सप्टेंबर या दिवशी पथसंचलन !
२७ सप्टेंबर या दिवशी नागपूर येथे ३ ठिकाणांहून संघाचे पथसंचलन होणार आहे. हे तिन्ही पथसंचालन पथके सकाळी ७.४५ वाजता व्हेरायटी चौकात एकत्र येतील. सरसंघचालक त्यांचे अवलोकन करतील. पथसंचलनानंतर योग प्रात्यक्षिकेही सादर केली जातील. या कार्यक्रमासाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. यंदाच्या कार्यक्रमात ‘बजाज समूहा’चे संजीव बजाज यांच्यासह घाना, इंडोनेशिया, थायलंड आणि अमेरिकेसह विविध देशांमधील नागरिक उपस्थित रहाणार आहेत.
संघाकडून ठिकठिकाणी हिंदु संमेलनांचे आयोजन !
शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशभरात अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरात घरोघरी जाऊन गृहसंपर्क अभियान चालवले जाईल. राज्यात ठिकठिकाणी हिंदु संमेलने, युवा संमेलने आणि संवाद कार्यक्रम यांचे आयोजन केले जाणार आहे. बेंगळुरू, कोलकाता आणि मुंबई येथे सरसंघचालकांचे विशेष संवाद कार्यक्रम होणार आहेत.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा