पंतप्रधान मोदी यांची राष्ट्राला उद्देशून संबोधन करतांना घोषणा
(‘जीएसटी’ म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स – वस्तू आणि सेवा कर)

नवी देहली : उद्यापासून सुधारित ‘जीएसटी’ (वस्तू आणि सेवा कर) लागू होईल. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत आहे. एक प्रकारे उद्या देशभरात ‘जीएसटी बचत महोत्सवा’ला प्रारंभ होईल. हा जीएसटी महोत्सव नागरिकांची बचत वाढवेल आणि त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येईल, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी २१ सप्टेंबरला राष्ट्राला उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात केले. २२ सप्टेंबरपासून देशात जीएसटीच्या दरात कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वस्तूंचे मूल्य अल्प होणार आहे.
भारताच्या विकासाला गती मिळेल !
My address to the nation. https://t.co/OmgbHSmhsi
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2025
पंतप्रधान पुढे म्हणाले की,
देशातील गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला आणि व्यवसाय मालक, यांना या बचत महोत्सवाचा लाभ होईल. या सणासुदीच्या काळात प्रत्येकाचे तोंड गोड होईल. या सुधारणांमुळे भारताच्या विकासाच्या गाथेला गती मिळेल. ते व्यवसाय सुलभ करतील आणि गुंतवणूक आकर्षित करतील. ते विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्याला समान भागीदार बनवतील. आता केवळ ५ आणि १८ टक्केच जीएसटी लागू होईल. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू आणि अन्नपदार्थ स्वस्त होतील. १२ टक्के दराने कर आकारल्या जाणार्या ९९ टक्के वस्तूंवर आता ५ टक्के कर आकारला जाईल. जीएसटी अल्प झाल्यामुळे त्यांना घर, टीव्ही, शीतकपाट, मोटारसायकल, दुचाकी आदी खरेदी करण्यासाठी अल्प खर्च करावा लागेल. प्रवासही स्वस्त होईल.
🇮🇳 PM Modi's addresses the nation on eve of Navratri!
🪙 NDA hails it as “GST Bachat Utsav”🎉
💰 #GSTReforms + Income Tax cuts = Double Bonanza for the middle class!
✅ Only 5% & 18% slabs now
Food, medicines, soap, brush, insurance → tax-free or just 5%!Video Courtesy:… pic.twitter.com/jKVMGA2Fra
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2025
काय होईल स्वस्त ?
|
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक