सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन् यांच्या खंडपिठाने दिला निर्णय

नवी देहली – केरळमधील कॅथॉलिक पाद्री एडविन पिगारेझ याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन् यांच्या खंडपिठाने स्थगित करून त्याला जामीन संमत केला आहे. उच्च न्यायालयाने त्याला २० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली होती; मात्र पाद्री पिगारेझ याने १० वर्षे कारावास भोगला असल्याचे लक्षात घेऊन शिक्षा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
🚨 CJI BR Gavai led bench suspends life sentence of Father Edwin Pigarez, a Catholic priest convicted of repeatedly raping a minor girl inside church premises.
SC: “Even if 20-year sentence is accepted, he has already undergone half.”
Just days ago, CJI & Justice Vinod Chandran… pic.twitter.com/8r9XIjJF6e
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 19, 2025
सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती यांच्या खंडपिठाने म्हटले की,
आरोपीने १० वर्षे शिक्षा भोगली आहे, जी उच्च न्यायालयाने ठरवलेल्या शिक्षेच्या जवळपास अर्धी आहे. अपीलाची सुनावणी होण्यासाठी वेळ लागणार असल्याने शिक्षा स्थगित करून जामीन संमत केला.

काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन् यांच्या खंडपिठानेच खजुराहो (मध्यप्रदेश) येथील श्री वामन मंदिराच्या प्रकरणात निकाल देतांना ‘जा आणि देवालाच काही तरी करायला सांगा’, अशी टिपणी केल्याने त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?
वर्ष २०१४ ते २०१५ या कालावधीत केरळच्या एर्नाकुलम्मधील चर्चच्या प्रिस्बेटरीमध्ये पाद्री पिगारेझ याने ८ वीत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. स्थानिक सत्र न्यायालयाने त्याला पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षा अल्प करून २० वर्षांचा कारावास ठोठावला.
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !