‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या कल्याण शाखेच्या वतीने मोर्चा !

होमिओपॅथी आधुनिक वैद्यांना ॲलोपॅथी उपचाराचा सराव करण्याची अनुमती दिल्याचा निषेध !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या (सी.सी.एम्.पी.) होमिओपॅथी आधुनिक वैद्यांना ॲलोपॅथी उपचाराचा सराव करण्यास आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमधील नोंदणी करण्यास राज्य सरकारने दिलेल्या अनुमतीच्या निषेधार्थ ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या कल्याण शाखेने १८ सप्टेंबरला कल्याण येथे मोर्चा काढून निषेध केला. या मोर्चात कल्याण शहरातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे ५०० हून अधिक आधुनिक वैद्य सहभागी झाले होते.