कोलकाता (बंगाल) येथील घटना

कोलकाता (बंगाल) – येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. विमल जयस्वाल हे रहात असलेल्या इमारतीमधील उद्वाहक यंत्राच्या (‘लिफ्ट’च्या) बाजूला लावलेल्या दूरचित्रवाणी संचावर गणेश चतुर्थीच्या कालावधीत त्यांना ‘अॅडऑनमो’ आस्थापनाने एका विज्ञापनात श्री गणेशाला शर्ट-पँट घालून, तसेच हातात लॅप-टॉप घेऊन दाखवलेले आढळले. श्री गणेशाला अशा प्रकारे दाखवणे चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ या संदर्भात एक्सवर पोस्ट केली. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’सही कळवले. ही गोष्ट मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर ती आस्थापनापर्यंत पोचली. आस्थापनाने जयस्वाल यांच्या पोस्टला उत्तर दिले. ‘हे विज्ञापन करणार्या संबंधित अधिकार्यावर आम्ही कारवाई करत आहोत’, असे त्यात लिहिले होते. (आपल्या आजूबाजूला होत असलेल्या देवतांच्या अनादराच्या घटनांवर आपण कशा प्रकारे आंदोलन उभे करू शकतो, याचेच हे उदाहरण ! – संपादक)
Thread🧵1/
Kolkata (Bengal):
Hindu Activist @vimaljais prevents the mockery of Shri Ganesh by 'AdOnMo' company!🙏 A big congratulations to him!
At a time when Bengal is sliding towards “West Bangladesh,” such incidents are a ray of hope for Hindus. pic.twitter.com/ruci0Of2kV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 18, 2025
आस्थापनाच्या विज्ञापनातून विडंबनात्मक चित्र काढून टाकल्याचेही जयस्वाल यांना नंतर लक्षात आले. अशा प्रकारे ऐन गणेशोत्सव कालावधीत जागृत असलेले विमल जयस्वाल यांनी तात्काळ कृती करत श्री गणेशाचे होणारे विडंबन रोखले.
AdOnMo जैसे एडवरटाइजिंग कंपनीज अपनी मार्केटिंग के लिए भगवान गणेश का ऐसा चित्रण कहीं से भी उचित नहीं लगता । सनातन समाज को इसका विरोध सोशल मिडिया के माध्यम से करना चाहिए|@SanatanPrabhat @SurajyaCampaign pic.twitter.com/yx8QssmvNN
— Vimal Jaiswal (@vimaljais) September 9, 2025
मी विडंबन असल्याचे लक्षात येताच त्वरित वाचा फोडली ! – विमल जयस्वाल![]() या संदर्भात ‘सनातन प्रभात’शी बोलतांना श्री. जयस्वाल म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘अॅडऑनमो’ या आस्थापनाकडून श्री गणेशाच्या संदर्भातील काही प्रश्न विचारण्यात येत होते आणि त्यात श्री गणेशाला सुट-बुट घालून दाखवण्यात आले होते. हिंदूंच्या देवतेला अशा प्रकारे दाखवणे चुकीचे असल्याचे माझ्या लक्षात आले आणि मी या घटनेला वाचा फोडली.’’ |
जयस्वाल यांचे प्रयत्न कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणा देणारे ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
या घटनेविषयी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी ‘सनातन प्रभात’ला सांगितले, ‘‘श्री. विमल जयस्वाल हे हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगालचे सहसंयोजक आहेत. त्यांनी ज्या जागरूकतेने आणि तत्परतेने श्री गणेशाचे विडंबन रोखण्यासाठी प्रयत्न केले, ते कौतुकास्पद अन् इतरांना प्रेरणा देणारे आहे. बंगालमध्ये अशा प्रकारे कृती करण्याचा विचार अत्यल्प वेळा होतो, त्यात जयस्वाल यांनी केलेली धर्मसेवा इतरांनी अनुकरण करावी, अशीच आहे. ‘अॅडऑनमो’नेसुद्धा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर राखत तत्परतेने कारवाई केली. त्यासाठी समितीच्या वतीने मी त्यांचेसुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो.’’
संपादकीय भूमिकाकोलकात्याचे हिंदुत्वनिष्ठ विमल जयस्वाल यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे ! बंगाल राज्य हे ‘पश्चिम बांगलादेश’ बनण्याच्या मार्गावर असतांना अशा घटना हिंदूंसाठी आशेचा किरण असल्याचेच म्हटले पाहिजे ! |

जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !