‘ते माझ्या नियंत्रणात नाही, तुम्ही दुसर्‍या कुणाला हे काम सांगू शकता’, असे सरन्यायाधिशांना सांगता आले असते ना ? – कुमार चेल्लप्पन

सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन गवई ‘जा आणि देवाला सांगा’, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक माध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया 

श्री. कुमार चेल्लप्पन

प्रिय सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन्

तुम्ही धर्मनिरपेक्ष लोकांपेक्षा अधिक धर्मनिरपेक्ष होण्याचा प्रयत्न करत आहात का ? या देशातील हिंदूंची स्थिती गावातील मूर्ख लोकांपेक्षा वाईट असल्याने तुम्ही तुमच्या टिपण्या देऊन निघून जाऊ शकता; पण मला निश्‍चिती आहे की, वर्ष २०१५ मध्ये महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे प्रकाशित करणार्‍या चार्ली हेब्दो या फ्रेंच व्यंगचित्र नियतकालिकाच्या संपादकीय विभागाचे काय झाले, याची तुम्हाला माहिती असेल. प्रत्युत्तर म्हणून अल् कायदाच्या आतंकवाद्यांनी संपादकीय विभागातील सर्व १२ सदस्यांना गोळ्या घालून ठार मारले. मला शंका आहे की, तुम्ही सांगितलेली टिपणी तुम्हीच केली होती का ? कारण सरन्यायाधीश अशी टिपणी करणार नाहीत. प्रिय गवई, देव तुमचे रक्षण करील.

मंदिरावर विश्‍वास असणार्‍यांच्या मनात मंदिरे निर्माण करतात, ती भावना अवर्णनीय आहे. मी नेहमीच भाविकांना मंदिरासमोर येऊन अश्रू ढाळतांना पाहिले आहे. जेव्हा ते मूर्तीसमोर येतात, तेव्हा ते काहीही स्वीकारण्यासाठी रडत नाहीत, तर त्यांचे ओझे हलके करण्यासाठी त्यांना सांत्वन मिळते म्हणून ते रडत असतात. मंदिराचे बांधकाम आणि प्रतिष्ठापना ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. भारतीय विज्ञानानुसार हे आगमशास्त्राने विहित केलेल्या प्रक्रियेवर आधारित आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम, प्रतिष्ठापनाचे मोजमाप आणि दिशा हे सर्व वैदिक गणितानुसार आहे अन् ते आधुनिक विज्ञानाचे मार्गदर्शक आहे. याच कारणामुळे मंदिराच्या बांधकामामुळे पर्यावरण आणि मंदिर संकुल यांना चालना मिळाली आहे. मंदिराचे गर्भगृह आणि गर्भगृहातील मूर्ती यांच्यातील संबंध शरीर अन् आत्मा यांच्यातील संबंधांसारखाच आहे. दर्शनामुळे आणि मंदिरातील पूजेमुळे भक्तांची प्रार्थना ऐकणे अन् त्यांच्या बौद्धिक जीवनात येणार्‍या समस्यांवर उपाय शोधणे शक्य होईल, हे स्पष्ट करावे का ? आपले धर्मग्रंथ याविषयी पुष्कळ तपशीलवार सांगतात.

जेव्हा एखादा भक्त त्यांच्यापुढे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी याचिका घेऊन येतो, तेव्हा सरन्यायाधिशांनी काय करावे ? जर ते स्वतःहून केले जाऊ शकते, तर संबंधित व्यक्तींना भक्तांची मागणी पूर्ण करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. अन्यथा ‘ते माझ्या नियंत्रणात नाही, तुम्ही दुसर्‍या कुणाला हे काम सांगू शकता’, असे सांगता आले असते. ‘‘जा आणि देवाला सांगा’’, असे उत्तर देण्याची आवश्यकता नाही. असे ऐकले जाते की, एक मार्क्सवादी नेता गुरुवायूर मंदिरात गेला, त्याने कोपर्‍याकडे हात दाखवला आणि विचारले, ‘‘श्रीकृष्ण तिथे बसले आहेत का ?’’ त्याचप्रमाणे ज्या भक्तांनी ‘पोलिसांनी मंदिरांचे रक्षण करावे’, असे म्हटले होते, त्यांना  ‘‘देवाला पोलीस संरक्षण का ? तो स्वतःचे रक्षण करू शकत नाही का ?’’, असे विचारले गेले. सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन् गवई हे त्यांपैकी एक नाहीत; परंतु ‘प्रसारमाध्यमांचे मित्र सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन् यांचा चुकीचा अहवाल देऊ शकत नाहीत’. मला वाटते की, ते हुशार आणि बुद्धीमान आहेत.

लेखक : श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ. (१८.९.२०२५)


सरन्यायाधिशांकडून हिंदु श्रद्धेचा अवमान : बिनशर्त क्षमायाचना करा !

सरन्यायाधीश गवई यांनी जी टिपणी केली, ती अत्यंत आक्षेपार्ह आहे, नव्हे तो हिंदु श्रद्धेचा अवमान आहे. गवई स्वतः बौद्ध असल्यामुळे कदाचित् त्यांना हिंदु धर्माच्या श्रद्धेची किंमत वाटली नसावी. हिंदु धर्म सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण देतो. त्यांच्यात आणि ही मूर्ती खंडित करणार्‍या मुसलमान घुसखोरांमध्ये मग काय भेद राहिला ? धर्मांधांविरुद्ध ‘ब्र’ काढण्याचे धाडस होते का ? नाही; कारण भीती असते.

ते काहीही असो; पण ‘सरन्यायाधीश गवई यांनी समस्त हिंदु धर्मियांची विनाअट क्षमा मागणे आवश्यक आहे. ती न मागितल्यास त्यांच्यावर महाभियोग चालवावा’, अशी विनंती भाजपच्या विनीत गोयंका यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहून केली आहे. राष्ट्रपती महोदया काय निर्णय घेतील तो घेवोत, तूर्त तरी मी एक हिंदु म्हणून त्रिवार निषेध करतो आणि प्रत्येक हिंदूने तो केला पाहिजे !

– श्री. हर्षद सरपोतदार, सनदी लेखापाल, पुणे. (१७.९.२०२५)


सरन्यायाधीश पदाच्याही वर पोचण्यासाठी ‘हिंदु धर्माची कुचेष्टा’ !

श्री. अभिजित जोग

‘सेक्युलर (निधर्मी), पुरोगामी विचारवंत’ या सरन्यायाधीश पदाच्याही वर असलेल्या पदाला पोचण्यासाठी ‘हिंदु धर्माची कुचेष्टा’ हा सोपा, सुरक्षित आणि हमखास मार्ग वापरण्याचे चातुर्य सरन्यायाधीश गवई यांनी दाखवले !

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१७.९.२०२५)


हिंदु – मुसलमान करू नका !

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

एखादे भयंकर पाप केल्याप्रमाणे हिंदूंना सांगितले जाते; पण कायदा करणारी संसद, न्यायव्यवस्था आणि प्रशासन हे लोकशाहीचे तीनही स्तंभ हिंदु – मुसलमान करत असतात, त्याचे काय ? देवांनाच विचारून करायचे, तर न्यायालये हवीत कशाला ?, असे वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (१७.९.२०२५)


हे ही वाचा →

GHHF Demand : सरन्यायाधिशांमध्ये खरोखर नैतिकता असेल, तर त्यांनी पदाचा त्याग करावा !

संपादकीय : हिंदूंवर सर्वाेच्च वार ?

हिंदूच फसला सदोदित ।

हिंदु देवतांना । देऊन दूषण ।
सांगतो ‘भूषण’ । कुणाला हे ? ॥ १ ॥

हिंदु मंदिरांची । कुणी केली लूट ।
कोण पाडी फूट । देशामध्ये ॥ २ ॥

धर्मद्वेष हीच । घेऊनिया स्फूर्ती ।
फोडल्या या मूर्ती । सांगा कुणी ॥ ३ ॥

मंदिरे फोडिली । श्रद्धा ना भंगली ।
संस्कृती रंगली । उदार ही ॥ ४ ॥

तुटले मस्तक । जाहला उशीर ।
नवे लावू शीर । पुजू चला ॥ ५ ॥

उदारमताची । परंपरा श्रेष्ठ ।
दुर्लक्षितो दुष्ट । दुर्जन ते ॥ ६ ॥

कांत म्हणे न्याय । बघा हा कसला ।
हिंदूच फसला । सदोदित ॥ ७ ॥

– श्री. श्रीकांत उमरीकर, हिंदुत्वनिष्ठ