
जयपूर (राजस्थान) – राजस्थानमध्ये गेल्या आठवड्यातच धर्मांतरविरोधी कायदा विधानसभेत संमत झाला. त्यानंतर श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनूपगड येथे एका पाद्र्याकडून चालवला जात असलेला धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला. पाद्री पोलिस बरजो याने मागील काही वर्षांत ४५० हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवले आहे. एका पीडितेने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली, तेव्हा त्याची कृत्ये उघडकीस आली. धर्मांतर कायद्यानुसार अशा गुन्ह्यात ५० लाख रुपयांचा दंड आणि आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. बरजोला अटक करून चौकशी चालू आहे.
विश्व हिंदु परिषदेचे अनूपगड जिल्हामंत्री कृष्णराव यांनी आरोप केला की, बरजो आणि त्याची संस्था लोकांना कधी आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन, तर कधी विवाहाची हमी देऊन बलपूर्वक धर्मांतर करत होती.

प्रत्येक महिन्याला २० जणांचे धर्मांतर करण्याचे उद्दिष्ट
पोलिस बरजो हा व्यावसायिक पाद्री असून त्याला प्रतिमहा केवळ ९ सहस्र रुपये वेतन मिळते. तो ‘फ्रेंडस मिशनरी प्रेयर बँड’ या ख्रिस्ती संस्थेसाठी काम करतो. या संस्थेचे काम म्हणजे हिंदूंना कधी प्रलोभन देऊन, तर कधी फसवणुकीतून धर्मांतर करणे. या संस्थेत प्रत्येक पाद्रीला धर्मांतराचे मासिक ध्येय देण्यात आलेले आहे. बरजोलाही प्रतिमहा २० जणांचे धर्मांतर घडवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वर्ष २००८ पासून तो या संस्थेत कार्यरत असून आतापर्यंत ४५० जणांचे धर्मांतर घडवून आणले आहे.
पोलीस घेत आहेत पीडितांचा शोध !
पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेण करत आहेत. ज्या लोकांचे धर्मांतर करण्यात आले, त्यांचा शोध चालू आहे. हे षड्यंत्र किती मोठे आहे आणि याला निधी कुठून मिळतो आहे याचेही अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती