कडक पोलीस बंदोबस्तातही झाली दगडफेक

मंड्या (कर्नाटक) – जिल्ह्यातील मद्दूरु शहरातील राम रहीम नगरमध्ये ७ सप्टेंबरच्या रात्री गणेशविसर्जनाची मिरवणूक चालली होती. मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना तिच्यावर दगडफेक करण्यात आली. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही मुसलमानांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केली. यामुळे संतापलेल्या हिंदूंनीसुद्धा यास दगडफेकीद्वारे प्रत्युत्तर दिले. दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हलका लाठीमार केला. त्यानंतर हिंदु कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत भगवे ध्वज हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.
🚨 Maddur, Karnataka: Ganesh visarjan procession attacked with stones hurled from a mosque; despite heavy police presence!
If such attacks happen under police watch, is this India or Pakistan?
In Congress-ruled Karnataka, even police can’t rein in fanatics!#HindusUnderAttack… pic.twitter.com/TBiBYRtZN0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 8, 2025
१. या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही समुदायांशी संवाद साधून त्यांना शांत केले.
२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मशिदीपासून अनुमाने ५०० मीटर अंतरावर दगडफेक चालू झाली. मंड्याचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बाळदंडी म्हणाले की, हिंसाचारप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
३. या घटनेचा निषेध म्हणून ८ सप्टेंबरच्या सकाळी शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन निदर्शने केली. यावेळी पुन्हा दगडफेक झाली. परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
मंड्या जिल्ह्याचा दंगलींचा इतिहास !
गेल्या वर्षीसुद्धा मंड्या जिल्हातीलच नागमंगल शहरात विसर्जन मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक झाली होती. त्या वेळी अनेक दुकानांना आग लावण्यात आली होती.
२१ मुसलमानांना अटक ! – जिल्ह्याचे पालकमंत्री
मंड्या जिल्ह्याचे पालकमंत्री चेलुवरयास्वामी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, २१ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. त्यात बाहेरचे एक, दोन किंवा तीन लोक असू शकतात. मशिदीच्या बाजूनेही दोन दगड फेकल्याची माहिती मिळाली आहे. तातडीने कारवाई करण्यात आली आहे. तरीही भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षांचे नेते आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करत आहेत. हिंदूंवर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही किंवा कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. (हिंदूंनी कोणताही गुन्हा केलेलाच नाही, तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा प्रश्न येतोच कुठून ? हिंदूंवर दया दाखवण्याची भाषा करणारे काँग्रेसचे नेते चेलुवरयास्वामी यांचा निषेध ! – संपादक)
परिस्थिती नियंत्रणात आहे ! – कर्नाटकाचे गृहमंत्री जी. परमेश्वर
मद्दूरु शहरात परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात तणाव वाढल्याने जमावबंदी लागू करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केले.
काँग्रेस सरकारच्या चिथावणीखेरीज अशा घटना घडल्या नसत्या ! – भाजप
कांग्रेस सरकारमुळे आम्ही पाकिस्तानात आहोत कि काय ?, असा संशय येत आहे. गेल्या २ वर्षांपासून अशाच घटना घडत आहेत. धर्मस्थळ (हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची अपकीर्ती केल्याचे प्रकरण) आणि बानू मुश्ताक यांच्यावरील वादानंतर आता मद्दूरुमध्येही त्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. या घटनेला थेट सरकार उत्तरदायी आहे. सरकारच्या चिथावणीखेरीज अशा घटना घडल्या नसत्या.
अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळेच बहुसंख्य हिंदु समाजावर जीवघेणी आक्रमणे ! – हिंदु जनजागृती समिती
धर्मांधांचे हे आक्रमण पूर्णपणे पूर्वनियोजित षड्यंत्राचा भाग आहे. हिंदु जनजागृती समिती या घटनेचा तीव्र निषेध करते. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र, श्रीरामनवमी, हनुमान जयंती अशा सण-उत्सवांच्या प्रत्येक मिरवणुकीवर दगडफेक होत आहे. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याच्या धोरणामुळे बहुसंख्य हिंदु समाजावर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या कृत्याला उत्तरदायी असलेल्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
संपादकीय भूमिका
|
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन