मैसुरू दसरा उत्सवासाठी कर्नाटक सरकारने बानू मुश्ताक यांना निमंत्रण दिल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुद्वेष्ट्या कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना मैसुरू दसरा महोत्सवाचे निमंत्रण दिल्यावरून कर्नाटकात हिंदूंमध्ये संतापाची भावना आहे. एकीकडे भाजपचे नेते आणि माजी खासदार प्रताप सिम्हा यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे, तिथे आता हिंदु जनजागृती समितीनेही मुख्यमंत्री सिद्धारामय्या, तसेच कन्नड आणि संस्कृती खात्याच्या मुख्य सचिव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. कर्नाटकाचे समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी ‘सनातन प्रभात’ला ही माहिती दिली.
The Hindu Janajagruti Samiti (HJS) @HinduJagrutiOrg has objected to the Karnataka government’s decision to invite writer Bhanu Mushtaq as the chief guest.@JaipurDialogues @BattaKashmiri https://t.co/YBOrNAgYjD
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) September 6, 2025
यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून श्री. गौडा यांनी सांगितले की,
१. मैसुरू दसरा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर तो हिंदूंचा एक पवित्र सण आहे.
२. परंपरेनुसार देवी चामुंडेश्वरी हिच्या उपस्थितीत दिव्यांची रोषणाई, पुष्पांजली, हळद-कुंकू आणि पूजा-अर्चा करून कार्यक्रमाचे उद्घाटन होत आले आहे.
३. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात बानू मुश्ताक यांनी हिंदूंसाठी पूज्य असलेल्या देवी भुवनेश्वरीचा (कन्नडम्माचा) अवमान केला होता. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावूनही त्यांनी आजतागायत क्षमा मागितलेली नाही.
४. अशा व्यक्तीला दसर्याच्या उद्घाटनाचा मान देणे आणि सरकारकडून १० लाख रुपयांचे पारितोषिक देणे, हा हिंदूंच्या धार्मिक-सांस्कृतिक भावनांचा अवमान आहे.
⚖️@HinduJagrutiOrg issues legal notice to Karnataka Govt demanding withdrawal of Banu Mushtaq’s invite for Mysuru Dasara 2025.
Objection:
– Dasara is a sacred Hindu festival– Banu mocked Goddess Bhuvaneshwari & traditions
– Govt plans ₹10L honour
HJS: Will move High Court… https://t.co/NX3uYTeoC8 pic.twitter.com/bQtpxuBMzu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2025
हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागण्या अशा !

१. बानू मुश्ताक यांना दिलेले उद्घाटनाचे निमंत्रण तात्काळ मागे घ्यावे.
२. अन्यथा ‘उद्घाटन हिंदु धार्मिक परंपरेनुसारच होईल’, याची सरकारने लेखी हमी द्यावी.
३. कन्नड, कन्नडम्मा आणि कर्नाटकाच्या परंपरेचे पावित्र्य जपले जावे.
📜HJS Legal Notice to Karnataka Govt@HinduJagrutiOrg has issued a legal notice to CM Siddaramaiah & Kannada-Culture Dept demanding withdrawal of Banu Mushtaq’s invite to inaugurate #MysuruDasara 2025@MohanGowda_HJS@ANI @PTI_News @ians_india@republic @TimesNow @IndiaToday pic.twitter.com/pETy8Cg1L3
— HJS Karnataka (@HJSKarnataka) September 6, 2025
सरकारला चेतावणी !
७ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास समिती कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करेल, तसेच फौजदारी आणि जनहित याचिकासुद्धा प्रविष्ट करण्यास समिती कटीबद्ध असल्याचे श्री. गौडा यांनी सांगितले.
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’