डॉलरवरील अवलंबित्व अल्प करण्यासाठी काम करण्यावर उभय देशांची जाहीर स्वीकृती !

तियानजिन (चीन) – येथे चालू असलेल्या २ दिवसांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेनंतर भारत-रशिया यांची द्विपक्षीय वार्ता आयोजित करण्यात आली होती. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन , पुतिन यांच्या वाहनातून एकत्रच निघाले. या छायाचित्राने जगाचे लक्ष वेधले आहे. याचे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाचे तेल खरेदी केल्यावरून भारतावर ५० टक्के आयात कर लादला आहे. प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी आणि पुतिन यांनी गाडीमध्ये बसून अनुमाने ४५ मिनिटे गोपनीय संभाषण केले आहे. गाडीतील या चर्चेचे छायाचित्र स्वत: मोदी यांनी ‘एक्स’वरून पोस्ट केले आहे.
🤝 🇮🇳 Modi–🇷🇺 Putin meet at #SCOSummit2025 sends a STRONG global signal!
After Trump’s 50% duty on India over the Russian oil, the two leaders held a 45-min private talk, focusing on: trade & energy, fertilisers, defence, culture, and expanding rupee–rouble trade to cut dollar… pic.twitter.com/2mTRudFc5B
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 1, 2025
एका आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार पुतिन स्वतः पंतप्रधान मोदी यांच्या येण्याची अनुमाने १० मिनिटे वाट पहात होते. नियोजित स्थानी पोचल्यानंतरही ते बराच वेळ गाडीत बोलत राहिले. उभय नेत्यांनी या व्यवहारातून ट्रम्प यांना स्पष्ट शब्दांत एक कडक संदेश दिला आहे.
भारत आणि चीन यांच्यात वाढत असलेल्या निकटतेच्या प्रयत्नांचे पुतिन यांच्याकडून उघडपणे कौतुक !

१. गाडीतील संभाषणाव्यतिरिक्त मोदी आणि पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठकसुद्धा झाली.
२. यात उभय देशांनी व्यापार, खत, ऊर्जा, संस्कृती आणि संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. यात विशेषतः डॉलरवरील अवलंबित्व अल्प करण्यासाठी रुपया-रुबल व्यापार प्रणाली सुलभ करण्यासाठी काम करण्यावर स्वीकृती दाखवण्यात आली.
३. पुतिन या वेळी म्हणाले की, युक्रेन युद्धासारख्या समस्या सोडवण्यात भारत आणि चीन यांसारखे आशियाई देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी भारत आणि चीन यांच्यात जवळीक वाढवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे उघडपणे कौतुकही केले.
४. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या बैठकीविषयी म्हटले की, आम्ही स्थानिक आणि जागतिक समस्यांविषयी विचारांचे आदान-प्रदान केले. यात युक्रेनमधील समस्येचेही शांततापूर्वक उपाय काढण्यावर भर देण्यात आला. आमची व्यूहरचनात्मक आणि विशेष भागीदारी स्थानिक, तसेच जागतिक स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Had an excellent meeting with President Putin on the sidelines of the SCO Summit in Tianjin. Discussed ways to deepen bilateral cooperation in all sectors, including trade, fertilisers, space, security and culture. We exchanged views on regional and global developments, including… pic.twitter.com/DhTyqOysbf
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025
रशिया-भारत-चीन (‘रिच’ राष्ट्रे) यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या सौहार्दपूर्ण भेटीची छायाचित्रे जागतिक चर्चेचा विषय !
अमेरिकेचा भारतावरील आयात कराचा कहर, तसेच रशियावर युक्रेन युद्धावरून तणाव पहाता यंदाची ‘शांघाय सहकार्य संघटने’ची शिखर बैठक एका महत्त्वपूर्ण गोष्टीमुळे गाजत आहे. ती म्हणजे रशिया, भारत आणि चीन या देशांच्या (‘रिच’ राष्ट्रांच्या) राष्ट्रप्रमुखांच्या सौहार्दपूर्ण भेटीची छायाचित्रे ! स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती छायाचित्रे ‘एक्स’वर पोस्ट केली आहेत. यांमध्ये मोदी, पुतिन, तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अत्यंत आस्थेने एकमेकांशी चर्चा करत असल्याचे, विनोद करत असल्याचे दिसत आहेत. या सगळ्यात संघटनेचा सदस्य देश पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मात्र या सगळ्या गोष्टींपासून एकटे पडल्याचे निदर्शनास आले. एका प्रसंगी मोदी आणि पुतिन दोघे गप्पा मारत जात असतांना शरीफ त्यांच्याकडे डोळ्यांच्या कोपर्यांतून पहात असल्याचे समोर आले. या सर्व गोष्टी विशेषत: अमेरिकेला अंतर्मुख करायला लावणार असल्याचेही बोलले जात आहे. |

US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !