काँग्रेसने मुसलमान समाजाचा विश्वासघात केला असल्याचाही आरोप

बेंगळुरू (कर्नाटक) : मैसूरु दसरा उद्घाटनाला बानू मुश्ताक यांना निमंत्रण देण्याच्या कर्नाटक काँग्रेस सरकारच्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुसलमान नेत्यांनी या निवडीवर तीव्र आक्षेप घेतला असून काही मुसलमान धर्मगुरूंनी बानू मुश्ताक यांच्या विरोधात ‘फतवा’ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंत्री जमीर अहमद, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुसलमान धर्मगुरूंवर दबाव आणून फतवा काढण्यापासून रोखले, असा आरोप मुसलमान नेते सादिक पाशा यांनी केला.
🚨 Mysuru Dasara Row 🚨
Muslim leader Sadiq Pasha slams Congress over Banu Mushtaq issue.
🔹 Alleges clerics tried to issue fatwa, but Congress stopped it
🔹 Says Cong got 85% Muslim votes but failed on jobs & education
🔹 Warns: Inviting Mushtaq may hurt Hindu sentiments &… https://t.co/NX3uYTeWrG pic.twitter.com/p4nnsswG7K
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 1, 2025
सादिक पाशा पुढे म्हणाले की,
१. काँग्रेस सरकार ८५ टक्के मुसलमान मतांमुळे सत्तेत आले; पण त्याने मुसलमान समाजासाठी कोणतीही विकासाची कामे केली नाहीत. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी मुसलमान युवक-युवतींना मिळायला हव्या होत्या. त्याऐवजी ते आम्हाला खूश करण्यासाठी असे नाटक करत आहेत.
२. आमचा अल्लाह एकच देव आहे. कुंकू लावल्याने आणि आरती केल्याने मुसलमान धर्म खराब होतो. बानू मुश्ताक यांची वागणूक आणि प्रथा मुसलमानांप्रमाणे नाही. त्या धार्मिक प्रथा पाळत नाहीत.
३. बानू मुश्ताक यांना निमंत्रण दिल्यामुळे हिंदु समाजाच्या भावनांनाही ठेच पोहोचू शकते आणि यामुळे जातीय दंगली होऊ शकतात.
४. सरकार आमचा वापर करून वाद निर्माण करत आहे. डीजे-केजे हळ्ळी प्रकरणातील निर्दोष लोक अजूनही कारागृहात आहेत. ‘आम्हाला निवडून दिल्यास निर्दोष लोकांना बाहेर काढू’, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले होते. गेल्या निवडणुकीत आम्ही सिद्धरामय्या यांना बाजूला ठेवून डी.के. शिवकुमार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मतदान केले. कुमारस्वामी रा.स्व.संघवाले आहेत, हे ठाऊक होते; पण शिवकुमारसुद्धा संघवाले आहेत, हे जर आधीच ठाऊक असले असते, तर आम्ही मतदान करतांना विचार केला असता.
५. काँग्रेस सरकारने मुसलमान समाजाचा विश्वासघात केला आहे. जर हे असेच चालू राहिले, तर पुढील निवडणुकीत आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ.
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !