Yavat Pune Offensive Post : धर्मांधाच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे यवत (पुणे) येथे तणाव !

  • जमावाकडून संबंधिताचे घर आणि एक मशीद यांची तोडफोड, अनेक दुचाकी पेटवल्या

  • आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या सय्यद नावाच्या व्यक्तीला अटक !

यवत येथे एका मुसलमान व्यक्तीने सामाजिक माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर झालेला हिंदूंचा उद्रेक !

पुणे : दौंड तालुक्यातील यवत येथे १ ऑगस्टला सकाळी एका मुसलमान व्यक्तीने सामाजिक माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर दुपारी १२ नंतर यवतमधील आठवडा बाजार बंद करण्यात आला. यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या, तसेच जमावाकडून एका मशिदीची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या सय्यद नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. सामाजिक माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकारनगर भागात रहात असून स्थानिकांनी सहकारनगर येथे जाऊन त्याच्या घराचीही तोडफोड केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला, तरी यवत भागात तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे.

यवतमधील दोषींवर योग्य कारवाई करणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या ठिकाणी एका आमदाराची (संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस) सभा झाली म्हणून एका व्यक्तीने स्टेटस (सामाजिक माध्यमांवर इतरांना पहाता येण्यासाठी ठेवलेले लिखाण, चित्र) ठेवले, हे योग्य नाही. दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. कुणीही कायदा हातात घेऊ नये. यवतमधील दोषींची चौकशी करून आरोपींवर योग्य कारवाई करणार.

दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. कुणीही कायदा हातात घेऊ नये. यवतमधील दोषींची चौकशी करून आरोपींवर योग्य कारवाई करणार.

अलीकडेच धर्मांधाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना !

यवतमधील निळकंठेश्वर महादेव मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची एका धर्मांधाने मोडतोड करून विटंबना केल्याची घटना २६ जुलैच्या रात्री घडली होती. या प्रकरणी अमित पापा सय्यद या धर्मांधाला ३० जुलै या दिवशी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी ३१ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेद्वारे दिली. त्यानंतर पुन्हा १ ऑगस्ट या दिवशी आक्षेपार्ह पोस्ट ठेवण्यात आली.

पोलिसांकडून यवतमध्ये पथसंचलन

यवतमध्ये झालेली दगडफेक आणि जाळपोळ यांनंतर १ ऑगस्टच्या सायंकाळी २०० हून अधिक पोलिसांनी पोलीस गाड्यांमधून अन् चालत गावामध्ये पथसंचलन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच या भागात येऊन परिस्थितीची पहाणी करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ यवत (पुणे) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा !

दौंड (जिल्हा पुणे), १ ऑगस्ट (वार्ता.) : यवत येथील निळकंठेश्‍वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करून अमिन सय्यद याने विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ यवत येथे ३१ जुलै या दिवशी जागृत हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. संग्रामभैया जगताप, तसेच ‘वैष्णव किन्नर आखाड्या’चे प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी साखीजी यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी आणि शिवप्रेमी यांना संबोधित केले. या वेळी ३ सहस्रांहून अधिक जण उपस्थित होते. खुटबाव, केडगाव, पारगाव (सा.मा.) ग्रामपंचायत यांनीही ३१ जुलैला बाजारपेठ बंदचा निर्णय घेऊन या घटनेचा निषेध केला. एकंदर पंचक्रोशीतील अनेक गावांमधून या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

अमीन सय्यदवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करा ! – आमदार गोपीचंद पडळकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना हा हिंदु धर्मावर, स्वाभिमानावर आणि देशाच्या अस्मितेवर केलेला आघात आहे. यामागे असणार्‍या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर ‘बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्या’खाली गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी या वेळी भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी केली.

अनधिकृत मशिदींविषयी चौकशी करून कारवाई व्हावी ! – स्वामी हेमांगी सखीजी

‘वैष्णव किन्नर आखाडा’ प्रमुख स्वामी हेमांगी सखीजी

अनधिकृत मशिदी बांधल्या जातातच कशा ? बांधकामांना कोण अनुमती देते ? आणि विशिष्ट वेळी अनेक मुसलमान एकत्र येऊन नक्की तिथे काय शिकवले जाते ?,  याची चौकशी प्रशासनाने करायला हवी आणि आघात करणार्‍यांवर कारवाई करायला हवी, असे मत ‘वैष्णव किन्नर आखाडा’ प्रमुख स्वामी हेमांगी सखीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

हिंदु धर्मावर वारंवार होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – संग्रामभैया जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु धर्मावर होणारे आघात रोखायचे असतील, तर प्रत्येक हिंदूने जागृत होऊन त्या विरोधात एकत्र येऊन संघटितपणे निषेध करायला हवा. संघटित होऊन कृती केली, तरच हे रोखले जाईल, असे आवाहन अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्रामभैया जगताप यांनी केले.

मध्यप्रदेशातील घटनेविषयी सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्यामुळे गडबड झाली ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची विटंबना झाल्यानंतर कारवाई झाली. येथे झालेल्या सभेनंतरही काही अडचण नव्हती; मात्र मध्यप्रदेशमध्ये एक घटना घडली. त्याविषयी सामाजिक माध्यमावर एक पोस्ट करण्यात आली. त्यामुळे येथे गडबड झाली.

यवत, दौंड आणि पुणे येथील लोकांना मी सांगू इच्छितो की, येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. १४४ कलम येथे लावण्यात आले आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवत येथे भेट देऊन सांगितली.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांकडून पुणे जिल्ह्यात देवतांच्या मूर्ती आणि राष्ट्रपुरुषांचे पुतळे यांची  विटंबना करण्याच्या घटना वारंवार होत आहेत. त्यांना कायद्याचे भय न राहिल्यामुळेच अशा घटना घडत आहेत !
  • धर्मांध मुसलमान वारंवार हिंदू आणि राष्ट्रप्रेमी यांच्या भावना दुखावत असल्यामुळे त्यांचा उद्रेक झाल्यास त्यास उत्तरदायी कोण ?