हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांना निवेदन

कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन अन् पर्यावरणवादी स्वत:ची कृतीशून्यता लपवून वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणासाठी उत्तरदायी ठरवतात. त्यामुळेच श्री गणेशमूर्तींच्या वहात्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. तरी गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत, तसेच गणेशोत्सव काळात पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती मिळावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच प्रदूषण मंडळ यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांनी, तर प्रदूषण मंडळ येथे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. प्रकाश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, मधुकर नाझरे, सनातन संस्थेचे श्री. दिलीप सातपुते उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या
१. गेली २ वर्षे प्रशासन पंचगंगा नदीच्या काठावर बॅरिकेड्स लावून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करते. बॅरिकेड्स लावून बंदी करण्याच्या विषयी कुठेही शासन आदेशात उल्लेख नसतांना असे करून प्रशासन जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक कृती करण्याचा अधिकार हिरावून घेत आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची बंदी करू नये. कागदी लगद्याच्या मूर्तींचा प्रसार बंद करावा.
२. नदी, तलाव यांमध्ये श्रद्धेने मूर्ती विसर्जन करतात. हे विसर्जन धार्मिक विधीनुसार आवश्यक असते. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये. स्थानिक प्रशासनाला अशा सूचनाही दिल्या जाव्यात.
३. ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने कागदी लगदा हा प्रदूषणास कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीसुद्धा पर्यावरण विभाग आणि काही प्रशासकीय यंत्रणा याच मूर्तींचे ‘प्रमोशन’ (प्रसार) करत आहेत. हे पर्यावरणाच्या मूलभूत तत्त्वांनाही विरोध करणारे आणि धर्मश्रद्धांनाही मारक आहे. यावर त्वरित बंदी आणावी.
४. गणेशोत्सवाला पर्यावरणाच्या नावाखाली लक्ष्य करून नास्तिकवादी संघटना ‘मूर्तीदान करा’, ‘मूर्ती विसर्जन नको’ अशा प्रकारचा अपप्रचार करतात. यामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि धार्मिक भावना दुखावतात. शासनाने अशा अपप्रचार करणार्यांवर कारवाई केली पाहिजे.
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Kerala Shigella Outbreak Reported : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास