|

उज्जैन (मध्यप्रदेश) – येतील महिदपूरमधील नागपूर गावात एका सरकारी माध्यमिक शाळेतील शिक्षक शकील महंमद याने हिंदु देवता आणि भारतमाता यांची छायाचित्रे जाळली. इतकेच नव्हे, तर त्याने राष्ट्रध्वज जाळण्याचाही प्रयत्न केला. शकील महंमद याच्यावर हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक कुराण शिकवल्याचा आणि नमाजपठण करायला लावल्याचा आरोप आहे.
Ujjain: Govt School Teacher Shakeel Mohammad suspended for burning pictures of Hindu Deities, Bharat Mata 🇮🇳 and even attempting to burn the National Flag! 🇮🇳
How much poison was he spreading in young minds all this while?
👨🏫🔍 A full investigation is urgently needed!
If a… pic.twitter.com/bIpBJc3uXU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2025
१. शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२५ या दिवशी शकीलने विद्यार्थ्यांसमोर भगवान श्रीगणेश, श्री सरस्वतीदेवी आणि भारतमाता यांची छायचित्रे फाडून त्यांना आग लावली. तसेच त्याने विद्यार्थ्यांना ‘ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जिवे मरीन’, अशी धमकी दिली.
२. एका विद्यार्थ्याचा काका रोहित राठोड यांनी आरोपी शकील महंमद याच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. राठोड यांनी सांगितले की, त्यांचा पुतण्या अनुराग राठोड या माध्यमिक विद्यालयात ६वीचा विद्यार्थी आहे.
३. पोलिसांनी आरोपी शकील महमद याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २९८, ३५१(३)च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी शकील महंमदला अटक केली आहे, तर दुसरीकडे जिल्हा शिक्षण अधिकारी आनंद शर्मा यांनी शकील महंमदला निलंबित केले.
४. शकील महंमद याचे वरील कृत्य उघडकीस आल्यानंतर हिंदु संघटनांनी संताप व्यक्त केला. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निवेदन सादर करत महंमदवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
| हे छायाचित्र देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिका
|
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन