कोल्हापूर शहर येथील गुरुपौर्णिमेसाठी १ सहस्र २०० जिज्ञासूंची उपस्थिती !

कोल्हापूर, ११ जुलै (वार्ता.) – भारत हे ऋषिमुनींच्या चेतनेतून निर्माण झालेले प्राचीन राष्ट्र आहे. जगातील अनेक भाषांचे मूळ भारत असून भाषा आणि संस्कृतीचे माहेरघर भारत आहे. जगातील पहिला ज्ञानाधिष्ठीत समाज भारतात होता आणि खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र यांसह अनेक शास्त्रांचा गहन अभ्यास भारतात होत होता. गुरुकुल शिक्षणपद्धती हे या सर्वांचे गमक होते आणि इंग्रजांनी यावरच घाला घातला. ज्याक्षणी भारतातील गुरुकुल शिक्षण व्यवस्था संपली, तेव्हापासून भारतीय संस्कृतीचे अध:पतन होण्यास प्रारंभ झाला. भारत हा कधी देश नव्हता, असे सातत्याने बिंबवण्यात आले. यानंतर डावे, मार्क्सवादी यांनी धर्म, संस्कृती यांवर आक्रमणे करण्यास प्रारंभ केला. भारतीय समाजातील श्रद्धा, मूल्य नष्ट करण्याचे काम त्यांनी केले. यासाठी एक मोठी ‘इकोसिस्टिम’ कार्यरत आहे. जिहादी, मिशनरी, डावे हे सगळे मिळून हिंदूंमध्ये सांस्कृतिक आधारावर फूट पाडण्याचा योजनाबद्ध डाव आखत असून तो एक व्यापक कटाचा भाग आहे. त्यामुळे धार्मिक, आध्यात्मिक असलेल्या वारीत ‘संविधान दिंडी’, ‘समता दिंडी’ आणली जात आहे. जेव्हा धर्म, संस्कृती यांवर आक्रमणे झाली, तेव्हा गुरुपरंपरेने आपले रक्षण केले आहे. आताही आपण तोच भाग लक्षात घेऊन भारतातील महान गुरुपरंपरेनुसार वाटचाल केली, तर संस्कृतीवरील आक्रमण थोपवणे शक्य आहे, असे प्रतिपादन ‘असत्यमेव जयते’ पुस्तकाचे लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले. इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, राजारामपुरी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवासाठी १ सहस्र २०० जिज्ञासू उपस्थित होते. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवरपू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्तात्रेय पाटील, ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’चे राज्य संयोजक श्री. पराग फडणीस, ‘गीता मंदिरा’चे विश्वस्त श्री. हसमुखभाई शहा, श्री. अशोक गुरव, ‘पुणे लॉरी असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. एस्.एम्. पाटील, हिंदु महासभेच्या शीला माने, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नितीन चव्हाण, ‘तंटामुक्ती’चे श्री. सतीश पाटील, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री विजय पाटील, प्रशांत कागले, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, श्री. रघुनाथ टिपुगडे, भाजप सरचिटणीस श्री. सागर रांगोळे, अधिवक्ता संग्राम पाटील, अधिवक्ता रेखा भोसले, अधिवक्ता पुष्पक काकडे, हुपरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे, श्री. नितीन चव्हाण, श्री. कैलास दीक्षित, विश्व हिंदू परिषदेच्या वंदनाताइ बंबलवाड, नरसिंह मंदिराचे श्री.आप्पासाहेब गुरव, इचलकरंजी येथील बजरंग दलाचे श्री. दत्ता पाटील, भाजपचे प्रदेश सचिव श्री. महेश जाधव, श्री. सचिन कुलकर्णी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रूपाराणी निकम, श्री. कमलाकर किलकिले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळा’चे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, प्रसिद्ध उद्योजिका सौ. मनीषा वाडीकर यांसह हिंदुत्वनिष्ठ, वाचक, हिंतचिंतक, विविध संप्रदाय, विविध पक्ष, उद्योजक, विविध संप्रदाय अशा सर्व स्तरांतील जिज्ञासू महोत्सवासाठी उपस्थित होते. |

विशेष
|

निपाणी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी ५५० जिज्ञासूंची उपस्थिती !
निपाणी – येथील मराठा मंडळ, सांस्कृतिक भवन, साखरवाडी येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी ५५० जिज्ञासूंची उपस्थिती होती. या महोत्सवासाठी ‘व्ही.एस्.एम्. आभियांत्रिकी महाविद्यालया’चे प्राचार्य श्री. उमेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती. येथे कु. प्रतिभा तावरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. गेली २० वर्षे तरुणांना स्वरक्षणाचे धडे देऊन त्यांना सक्षम करणारे श्री. उत्तम सुर्यवंशी आणि ‘सद्गुरु त्वायक्वांदो ॲकॅडमी’चे श्री. बबन निर्मळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गडहिंग्लज येथील गुरुपौर्णिमेसाठी ८५० जणांची उपस्थिती !
गडहिंग्लज – गडहिंग्लज येथील विनायक प्लाझा, देसाई मंगल कार्यालय येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी ८५० जणांची उपस्थिती होती. येथे सौ. राजश्री तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येथे गावोगावी गोंदवलेकर महाराज यांच्या ‘श्रीराम नामा’चा प्रसार करणारे श्री. पिताश्री यादव – रामदासी यांचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवात ‘जिजा शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण केंद्रा’चे श्री. राजेंद्र मोरे यांनी उपस्थितांना काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे ? यांविषयी सर्वांना अवगत केले.


मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर