
कन्नूर (केरळ) – कर्नाटकातील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्या प्रकरणातील पसार असलेला मुख्य आरोपी अब्दुल रेहमान यास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ४ जुलै या दिवशी कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. कतारहून आलेला रेहमान विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
१. प्रवीण नेट्टारू यांची २६ जुलै २०२२ या दिवशी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुळ्या तालुक्यातील बेळ्ळारे गावात क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. नेट्टारू यांच्यावर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय’च्या)च्या गुंडांनी धारदार शस्त्रांनी आक्रमण केले होते.
२. या प्रकरणी काही मुख्य आरोपींना अटक झाल्यानंतर अब्दुल रेहमान पसार झाला होता. कतारमध्ये पळून गेल्याने तो अटकेपासून वाचत होता.
३. ‘एन्.आय.ए.’ने रोख बक्षीस घोषित केलेल्या ६ आरोपींपैकी अब्दुल रेहमान एक होता. त्याला अटक करणार्याला ४ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
४. यावर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केलेल्या ४ व्यक्तींमध्ये रेहमानचाही समावेश होता. या प्रकरणामध्ये एकूण आरोपींची संख्या २८ आहे.
संपादकीय भूमिकाआता अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !