काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी संघर्ष करणारे सुशील पंडित !

श्री. सुशील पंडित यांनी देहली विद्यापिठातून ‘बी.एस्सी.’ (अर्थशास्त्र) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून ‘एम्.ए.’ (चिनी) पदवी घेतली. त्यांनी कोलकात्यातील ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘टेलिग्राफ’ यांमध्ये काम केले. नंतर ‘मास मीडिया’तील ग्राहकांसाठी संप्रेषण (संवाद) व्यवस्थापित करणार्‍या काही ‘एम्.एन्.सी.’ नेटवर्कमध्ये काम केले. वर्ष २००० मध्ये त्यांनी स्वत:च्या ‘हाईव कम्युनिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’, या आस्थापनाची स्थापना केली. ते ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हर्टायझिंग’मध्ये ‘स्ट्रॅटेजिक मीडिया प्लॅनिंग’ शिकवण्याचे काम करतात. यासमवेतच ‘काश्मीरची संस्कृती आणि ओळख’ यासंदर्भातील त्रैमासिक पत्रिका ‘प्रजनाथ’चे ते संपादक आहेत. श्री. सुशील पंडित हे एक काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदु पंडितांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांनी यासाठी ‘रुट्स इन काश्मीर’ ही संघटना स्थापन केली आहे. त्याचे ते संस्थापक आहेत.

श्री. सुशील पंडित

वर्ष १९९० च्या दशकात जिहादी धर्मांधांच्या आक्रमणात १ लाखांहून अधिक हिंदु पंडितांच्या हत्या झाल्या, तसेच त्यांच्या महिलांवर बलात्कार झाले. त्यामुळे ४ लाखांहून अधिक काश्मिरी हिंदूंना त्यांचे घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले. तेव्हापासून आजपर्यंत काश्मिरी हिंदूंना त्यांच्या मातृभूमीत परत जाता आले नाही. हिंदूंचे विस्थापन आणि त्यांच्या मातृभूमीत परत जाण्याच्या ३५ वर्षांच्या संघर्षाचे श्री. सुशील पंडित हे साक्षीदार आहेत.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. काश्मिरी हिंदूंसाठी प्रयत्नरत असलेले सुशील पंडित !

काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करणार्‍यांना शिक्षा व्हावी आणि कलम ३७० हटवण्यात यावे, अशा त्यांच्या मागण्या राहिलेल्या आहेत. सध्या कलम ३७० हटवण्यात आले आहे; पण तेथे विस्थापित हिंदु पंडित यांचे सुरक्षितपणे पुनर्वसन होऊ शकेल, अशी कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. श्री. पंडित हे एक विचारवंत असून त्यांना विविध वृत्तवाहिन्यांवर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाते. गेली अनेक वर्षे ते विविध व्यासपिठांवरून काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंवरील अत्याचारांविषयी जनजागृती करत आहेत. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेला ‘हिंदूंचा वंशविच्छेद’ हा ‘नरसंहार’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंचे तेथे परत सन्मानाने पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

२. श्री. सुशील पंडित यांच्या हत्येचा प्रयत्न

श्री. सुशील पंडित हे हिंदुत्वनिष्ठ असून काश्मीरमध्ये हिंदु पंडितांचे परत पुनर्वसन व्हावे, यासाठी ते विविध व्यासपिठांवरून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना विरोधालाही सामना करावा लागला आहे. वर्ष २०२१ मध्ये सुखविंदर सिंह (वय २५ वर्षे) आणि लखन राजपूत (वय २१ वर्षे) यांना देहली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर सुशील पंडित यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता.

सुशील पंडित यांनी आर्टिकल  ३७०  व काश्मिरी हिंदू यांच्याविषयी व्यक्त केलेले विचार 

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम भेटीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेणारे श्री. सुशील पंडित !

सनातन प्रभात नियतकालिकांविषयी जाणून घेतांना श्री. सुशील पंडित (डावीकडे) आणि त्यांना माहिती सांगतांना अधिवक्ता योगेश जलतारे
(चित्रावर क्लिक करा)

१५.१.२०१८ या दिवशी श्री. सुशील पंडित रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी आश्रम भेटीचा प्रत्येक टप्प्यावर आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेतला. त्यांचे मधे-मधे ध्यान लागत होते. आश्रमातील प्रत्येक गोष्ट केवळ जाणून न घेता अनुभवण्याचा ते प्रयत्न करत होते. आश्रमात दर्शनार्थींना पंचतत्त्वांपैकी एखाद-दुसरी अनुभूती येते, उदा. सुगंध जाणवणे किंवा प्रकाश दिसणे इत्यादी. श्री. सुशील पंडित यांना आश्रमाच्या भिंतीला स्पर्श करून हलकेपणाची अनुभूतीही आली, म्हणजे वायूतत्त्वाची अनुभूतीही घेता आली. ध्यानमंदिरात गेल्यावर आपोआप ध्यान लागत असल्याने त्यांचे डोळे उभ्या-उभ्याच मिटायला लागले. त्यामुळे ते लगेचच आसंदीत बसले आणि त्यांनी ध्यानाचा आनंद घेतला. त्यांना ‘ध्यानमंदिरातून बाहेर पडावेसे वाटत नव्हते’, असे त्यांनी सांगितले. आश्रमात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या तोंडून केवळ एकच वाक्य बाहेर पडत होते, ‘‘अद्भुत ! सर्वकाही अद्भुत !!’’

– श्री. योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांमध्ये सहभाग

श्री. सुशील पंडित हे हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी होतात, तसेच ते यापूर्वी गोवा येथे होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त सहभागी झाले आहेत. श्री. सुशील पंडित यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष संवादाच्या अंतर्गत ‘क्या हम तृतीय विश्वयुद्ध की दिशा में बढ रहे हैं ?’ या ‘ऑनलाईन संवादा’मध्ये सहभाग घेतला आहे.

🚩 विशेष संवाद :🌏 क्या हम तृतीय विश्वयुद्ध की दिशा में बढ रहे हैं ?

यासमवेतच ‘भारताचे विकृत सेक्युलॅरिझम्’ या विषयावर आयोजित चर्चासत्रातही ते सहभागी झाले होते. त्याचे ‘फेसबुक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमांतून प्रसारण करण्यात आले.

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू !


‘वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंच्या सामूहिकपणे हत्या करण्यात आल्या, त्याला ‘नरसंहार’ म्हणून सरकारने स्वीकारावे; या नरसंहाराला उत्तरदायी असलेल्या सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावी; या नरसंहारात पीडित हिंदूंच्या भूमी आणि संपत्ती तेथील धर्मांधांनी बळकावल्या, त्या हिंदूंना परत देण्यात याव्यात अन् विस्थापित हिंदूंना काश्मीरमध्ये पुन्हा रहाण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात यावी’, अशा मागण्या आमच्या केंद्र सरकारकडे आहेत.

Sushil Pandit talks about a Genocide which is not acknowledged by the world. Kashmiri Hindu Genocide

(सौजन्य : IndUS Lens)

आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू !

– श्री. सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’

४. गोवा येथील सनातनच्या आश्रमाविषयी सुशील पंडित यांचे उद्गार !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हे उत्तम स्थान असून येथील वातावरण अद्भुत आहे. आश्रमातील साधक श्रद्धावान आहेत. ते सात्त्विक असून मला त्यांच्यात साधनेविषयी श्रद्धा जाणवली. साधकांप्रमाणे जीवनात अनुशासन आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. धर्मज्ञान संवर्धनाचे कार्य अन्य कुणी करत नसतांना सनातन संस्था ते करत आहे. हे अतुलनीय आहे.’

सुशील पंडित यांच्या अधिकृत फेसबुक पेजची लिंक  : https://www.facebook.com/sushil.pandit.520/?locale=hi_IN

हे वाचा → हिंदु संस्कृतीवरील आघातांचे सर्वांत भयावह उदाहरण म्हणजे हिंदु काश्मिरींचे दमन !

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷