
बीजिंग (चीन) – आपरेशन सिंदूरच्या वेळी पाककडून भारतावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले होते. यांतील काही क्षेपणास्त्रे चिनी बनावटीची होती. ती भारताने हवेतच उद्ध्वस्त केली, तर काही पडूनही फुटलीच नाहीत. यांत ‘पीएल-१५ ई’ हे क्षेपणास्त्र होते. याविषयी चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सीनियर कर्नल झांग जियाओगांग यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी भलतेच उत्तर देऊन वेळ मारून नेली.
झांग जियाओगांग म्हणाले की, तुम्ही ज्या क्षेपणास्त्राचा उल्लेख करत आहात, ते निर्यात केले जाणारे शस्त्र आहे. हे क्षेपणास्त्र देश-विदेशात अनेक संरक्षण प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान असे शेजारी आहेत, ज्यांना वेगळे केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजू शांत आणि संयमित रहातील, अशी अपेक्षा आहे.
संपादकीय भूमिकाचिनी साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे त्यांची भारतात नेहमीच टिंगल केली जाते. तीच गोष्ट त्याच्या शस्त्रास्त्रांचीही झाली आहे, हेच यातून स्पष्ट होते ! |
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman