काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे विधान !

पनामा सिटी (पनामा) – भारतात पुन्हा आतंकवादी आक्रमण झाले, आमचा देश म. गांधी यांच्याप्रमाणे देश दुसरा गाल पुढे करणार नाही, तर या आक्रमणाला योग्य उत्तर देईल, असे विधान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात केले. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाची आणि नंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगातील देशांना देण्यासाठी भारताने विविध देशांत सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली आहेत. यांपैकी एक शिष्टमंडळ अमेरिका खंडातील पनामा देशात पोचले आहे. तेथे थरूर बोलत होते.
India will no longer turn the other cheek like Gandhi, but will strike back! – Congress MP Shashi Tharoor
📌After 75 years, India—especially now a Congress MP—has finally realized how flawed Mohandas Gandhi’s philosophy was. Though delayed, it is encouraging that this… pic.twitter.com/2meiMFDmAq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2025
शशी थरूर पुढे म्हणाले की, म. गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या धाडसी नेतृत्वातून आपल्याला शिकवले की, आपण आपल्या हक्कांसाठी नेहमी उभे राहिले पाहिजे आणि भीतीविना जगले पाहिजे. भारतात आपल्याला आज आतंकवादाशी लढावे लागत आहे. ज्या लोकांना जग आतंकवादी म्हणते, त्यांना असे वाटते की, ‘ते भारतात येऊन निष्पाप लोकांना मारून काही मोठे राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट साध्य करत आहेत.’ कोणताही स्वाभिमानी देश अशा गोष्टींना बळी पडणार नाही. आता भारताने केवळ आतंकवाद्यांनाच नव्हे, तर त्यांना पाठिंबा देणारे आणि पोसणारे यांनाही शिक्षा करावी.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim