(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का.)
नवी देहली – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर भारताने अफगाणिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडले होते; मात्र आता दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या ‘न्यू अफगान व्हिसा’ धोरणानुसार ही सेवा चालू करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील, त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी आणि व्यापारी यांनाही व्हिसा दिला जाणार आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर मागील ५ वर्षे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील व्हिसा सेवा बंद होती.
१. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सामान्य होत आहेत. अफगाणिस्तानने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केले होते. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचाही तालिबानी सरकारने निषेध केला होता, तसेच तालिबान सरकारने भारताला ‘अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया होऊ देणार नाही’, असे आश्वासन दिले होते.
२. अफगाणिस्तानसमवेत भारताचे संबंध सुधारत असतांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात असणारे आतंकवादी आणि सीमावाद यांमुळे पाकिस्तान अन् अफगाणिस्तान यांच्यात तणाव आहे.

संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim