घरे, दुकाने आणि वाहने पेटवली : १० जण घायाळ

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यातील माशिहाटी गावात, २२ मेच्या दिवशी मुसलमानांच्या जमावाने हिंदूंच्या घरांना आग लावली. मासेमारीच्या वादातून एका मुसलमानाच्या झालेल्या हत्येनंतर हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.
🚨 Hindu Homes Attacked in Jessore, Bangladesh 🇧🇩🔥
In Moshiyahati village, Muslim mobs set fire to Hindu houses, shops & vehicles — 10 injured.
📢 The harsh truth: As attacks continue, Hindus in Bangladesh suffer silently while the world watches passively. Time to wake up and… pic.twitter.com/g5vgzpKlvi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2025
१. किसान दलाचे नेते तारिकुल इस्लाम यांचा पिल्टू बिस्वास नावाच्या व्यक्तीशी मत्स्यपालनासाठी बनवलेल्या तलावावरून वाद चालू होता. या वादातून तारिकुल यांची हत्या करण्यात आली. हा तलाव आधी दुसर्याचा होता; पण आता तारिकुल यांना कोणत्याही किमतीत हा तलाव नियंत्रणात घ्यायचा होता. यावरील वादातून तारिकुल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
#Bangladesh 🇧🇩 | On the night of 22.05.2025, Islamist mobs attacked Hindus in Moshiyahati village, #Jessore (Abhaynagar Upazila).
Houses were vandalized, looted, and set on fire. everything of value was taken.
How long will this go on?#HindusUnderAttackInBangladesh @UN_HRC… pic.twitter.com/0blqhqiR3M
— Voice of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VHindus71) May 23, 2025
२. या हत्येचे निमित्त करून मुसलमानांनी माशिहाटी गावात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. मुसलमान जमावाने गावातील हिंदूंच्या २० हून अधिक घरांना आग लावली, ४ दुकानांची तोडफोड केली आणि २ दुकाने पेटवून दिली. ६ वाहने (एक व्हॅन आणि ५ दुचाकी) पेटवून दिली. या आक्रमणात १० हून अधिक हिंदू घायाळ झाले. मुसलमानांनी सागर बिस्वास नावाच्या तरुणाचे अपहरणही केले. घटनेनंतर सुमारे २ घंट्यांनी पोलीस, सैन्याधिकारी आणि अग्नीशमन दल येथे पोचले.
३. मुसलमानांच्या आक्रमणानंतर गावातील बहुतेक हिंदु पुरुषांना त्यांची घरे सोडून पळून जावे लागले. अपहरण झालेल्या सागर बिस्वास याला सोडवण्यात आले आहे.
४. अभयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अब्दुल अलीम यांनी सांगितले की, तारिकुल यांच्या हत्येच्या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. येथील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदूंचा वंशसंहार होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे आणि त्याच वेळी भारतासह जगभरातील हिंदूही त्याकडे निष्क्रीयतेने पहात रहाणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे ! |
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड