ऑपरेशन सिंदूरचे यश !

नवी देहली – भारताने पाकमधील आतंकवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या आक्रमणामध्ये जैश-ए-महंमदचा कुख्यात आतंकवादी अब्दुल रौफ अझहर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. रौफ अझहर जैशचा प्रमुख मसूद अझहर याचा लहान भाऊ होता. तो वर्ष १९९९ मध्ये भारताच्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून अफगाणिस्तानच्या कंदहार येथे नेल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार होता. या आक्रमणात मसूद अझहर याच्या १० नातेवाइकांचा आणि जवळच्या ४ सहकार्यांचा मृत्यू झाल्याचे आधीच समोर आले होते.
रौफ याला बर्याच काळापासून पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्था आय.एस्.आय.कडून संरक्षण मिळत होते. वर्ष २०१० मध्ये अमेरिकेने त्याच्यावर निर्बंध लादले होते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये त्याचा समावेश करण्यासाठी भारताने वारंवार केलेले प्रयत्न चीनने नकाराधिकार वापरत फेटाळले होते.
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार