‘गोव्यातील बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रादेवी तपासणी नाक्यावरील भ्रष्टाचार उघड केला होता. या प्रकारानंतर पत्रादेवी तपासणी नाक्यावर सेवेत असलेले साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मंदार आडपईकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मंदार आडपईकर यांचे वाहतूक खात्याच्या उत्तर गोवा अंमलबजावणी विभागात (पणजी) स्थानांतर करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश वाहतूक खात्याने ४ एप्रिल २०२५ या दिवशी काढला आहे.’ (५.४.२०२५)