
आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असले की, प्रपंचात मजा आहे, अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणार्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले, तर आवडणार नाही. तो उड्या मारील, वाकडातिकडा पोहेल; तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले, तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की, मग तिची भीती वाटत नाही. विषय जोवर ओळखले नाहीत, तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात, त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत, ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज