Bangladeshi Muslims In Delhi : (म्हणे) ‘हो मी बांगलादेशी असून कुणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही ! – देहलीतील मुसलमानाचा धमकीचा व्हिडिओ

देहलीतील एका मुसलमानाने दिलेल्या धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित  

नवी देहली – देहलीतील एक व्हिडिओ  सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती कॅमेर्‍यासमोर उघडपणे ती बांगलादेशी असल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. एका पत्रकाराला ती व्यक्ती म्हणते की, तुम्हाला ज्याला हवे त्याला बोलवा. मी बांगलादेशी आहे, कुणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही.

या पत्रकारला तेथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, जर तुम्हाला इथे यायचे असेल, तर आधी तुम्हाला आमच्या मॅडमची अनुमती घ्यावी लागेल. यानंतर एक महिला तेथे येथे आणि ती रागाच्या भरात पत्रकार आणि चित्रीकरण करणारा यांना धमकावू लागते. ती म्हणते तुम्ही इथे कसे आलात? यानंतर ती महिला आणि तिथे उपस्थित असलेले लोक कॅमेरा बंद करायला सांगतात. हा व्हिडिओ देहलीतील एखाद्या वसाहतीतील असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतीय सुरक्षायंत्रणा आणि सरकारी यंत्रणा यांना हे लज्जास्पद आहे ! सरकार आता तरी बांगलादेशींना हाकलण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे का ?