Tughlaq Lane As Swami Vivekanad Marg : भाजपच्या खासदारांनी सरकारी निवासस्थानाच्या पाटीवरील ‘तुघलक लेन’ नाव पालटून ‘विवेकानंद मार्ग’ असे नाव लिहिले !

नवी देहली – भाजपचे खासदार दिनेश शर्मा आणि केंद्रीय मंत्री कृष्णा पाल गुर्जर यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेल्या पाटीवरील ‘तुघलक लेन’ हे नाव हटवून तेथे आता ‘विवेकानंद मार्ग’ असे नाव लिहिण्यात आले आहे; मात्र हा पालट अधिकृतपणे करण्यात आलेला नाही.

विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नाव पालटणे, ही इतिहासाची मोडतोड आहे. भाजपचे म्हणणे आहे की, मोगल शासकांची नावे काढून टाकावीत आणि त्याऐवजी भारतीय महापुरुषांची नावे लिहावीत.

संपादकीय भूमिका

तुघलक, बाबर, अकबर, हुमायू आदी मोगल बादशाहांची रस्त्यांना असणारी नावे पालटण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतांना पालिकेकडून ती का पूर्ण केली जात नाही ? हिंदूंनी आणखी किती वर्षे अशी मागणी करत रहायची ? देहलीमध्ये आता भाजपचे सरकार असल्याने सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !