
कोल्हापूर, ५ मार्च (वार्ता.) – समाजवादी पक्षाचे हिंदुद्वेषी आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले, तसेच हिंदुत्वनिष्ठांनी पुतळा पायाखाली तो घेऊन तुडवला. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘शिवशाही प्रतिष्ठान’चे श्री. सुनील सामंत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आंनदराव पवळ, ‘महाराज प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, शिवसेनेचे श्री. विकास जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.