
पिंपरी – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळोखे मळा आणि हगवणे मळा येथे शेतात लावलेली अफूची झाडे शासनाधीन केली आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. दिलीप चंद्रकांत काळोखे असे कह्यात घेतलेल्याचे नाव आहे. शेतामध्ये कांद्याच्या पिकात अफूची झाडे लावली होती. पोलिसांनी ३ लाख २७ सहस्र रुपये किमतीची २१८ अफूची झाडे शासनाधीन केली आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, साहाय्यक निरीक्षक, कर्मचारी यांनी केली. (अफूवर बंदी असतांना त्याची लागवड करण्यासाठी बियाणे कसे उपलब्ध होते ? याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी. – संपादक)