महापालिकेचा नियोजनशून्य कारभार !
पुणे – राज्यात काही दिवसांपासून ‘जी.बी.एस्.’ आजाराचा संसर्ग जाणवत आहे. या आजाराचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील ३ जणांचा मृत्यू झाल्याने महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील खासगी टँकरमधून येणारे पाणी आरोग्यासाठी घातक असून त्याने जी.बी.एस्. रोगाची लागण होण्याचा धोका असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. पुणे शहरात टँकर भरण्याच्या १५ ठिकाणांवरून टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित आहे. या टँकरच्या पाण्यात कॉलिफार्म आणि इ कोलाय बॅक्टेरिया आढळून आले आहेत. हे दोन्हीही जंतू मानवाच्या शरिरासाठी घातक आणि आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. धायरी, किरकीटवाडी, नांदेड गाव आणि ‘डी.एस्.के.विश्व’ परिसरातील ‘टँकर पॉईंट’वर कारवाई होण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका :पिण्याच्या पाण्याची मूलभूत आवश्यकताही महापालिकेला भागवता येत नाही, हे दुर्दैवी ! |