
कोची (केरळ) – बेकायदेशीरपणे रहाणार्या आणि काम करणार्या २७ बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एर्नाकुलम् जिल्ह्यातील उत्तर परवूर भागात त्यांना अटक करण्यात आली. केरळ पोलिसांनी जानेवारी महिन्यामध्ये एकूण ३४ बांगलादेशींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशी घुसखोर बंगालमधील कामगार असल्याचे भासवून वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. सीमा ओलांडल्यानंतर त्यांनी बंगालमध्ये बनावट आधारकार्ड बनवले होते. आधारकार्ड बनवणार्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशींना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची लवकरात लवकर हकालपट्टी होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, तसेच ते परत भारतात घुसखोरी करणार नाहीत, याकडेही लक्ष दिले पाहिजे ! |