१. सगुण हे निर्गुणासाठी आहे आणि निर्गुण हे सगुणासाठी आहे. एकूण सगुण आणि निर्गुण यांच्या संदर्भात केलेल्या खटाटोपातून शून्यावस्थेची प्रचीती येते.
२. संत कितीही मोठे असोत, त्यांना प्रवास हा करावाच लागतो. त्यांच्या प्रवासातील पूर्ण प्रचीतीचे क्षण एकत्रित करून त्या प्रचीतीनुरूप त्यांना संतत्वाचे ब्रीद चिकटते.
– गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)