Yogi On Bangladesh Sambhal & Ayodhya : बाबरने जे अयोध्येत केले, तेच संभलमध्ये झाले, तेच बांगलादेशात होत आहे !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अयोध्या (उत्तरप्रदेश) – बाबराच्या लोकांनी ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत काय केले ते आठवते का? (श्रीराममंदिर पाडून मशीद उभारण्यात आली) संभल येथेही असेच घडले. (हरिहर मंदिरावर जामा मशीद बांधण्यात आली) बांगलादेशातही तेच होत आहे. (हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होत आहे) या तिन्ही गोष्टींचा स्वभाव आणि डी.एन्.ए. (डीऑक्सीरिबोन्यूक्लिक अ‍ॅसिड) समान आहे. जर कुणाला असे वाटत असेल की, हे बांगलादेशात घडत आहे, तर तेच घटक येथेही तसेच घडवण्याची वाट पहात आहेत, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. येथे ४ दिवसांच्या रामासण मेळ्याच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. शरयू किनार्‍यावरील रामकथा उद्यानात ५ ते ८ डिसेंबर या काळात हा मेळा होत आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मानसिकतेच्या लोकांशी कधीही बंधूभाव निर्माण होऊ शकत नाही कि सर्वधर्मसमभाव ठेवला जाऊ शकत नाही. अशांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंनी नेहमीच सतर्क रहाणे आवश्यक आहे !