Bangladesh Hindu Temples Vandalized : चितगाव (बांगलादेश) येथे शुक्रवारच्‍या नमाजठणानंतर धर्मांध मुसलमानांकडून ३ मंदिरांची तोडफोड

चितगाव (बांगलादेश) – येथे शुक्रवार, २९ नोव्‍हेंबर या दिवशी नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने ३ हिंदु मंदिरावर आक्रमण करून तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीही ३ मंदिरांवर आक्रमण करण्‍यात आले होते.

१. येथील हरिशचंद्र मुनसेफ मार्ग येथे २९ नोव्‍हेंबरला दुपारी सुमारे २.३० च्‍या सुमारास धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने शांतानेश्‍वरी मातृ मंदिर, शनिमंदिर आणि शांतनेश्‍वरी कालिबाडी मंदिर या मंदिरांना लक्ष्य केले. मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी सांगितले की, घोषणाबाजी करत असलेला शेकडोंचा जमाव मंदिरावर चाल करून आला. या जमावाने मंदिरांवर दगड आणि विटा यांचा मारा केला. यात २ मंदिरांच्‍या दारांची हानी झाली.

२. शांतिनेश्‍वरी मंदिर व्‍यवस्‍थापन समितीचे स्‍थायी सदस्‍य तपन दास यांनी सांगितले की, शुक्रवारच्‍या नमाजपठणानंतर शेकडो लोकांचा जमाव मंदिराच्‍या दिशेने चाल करून आला. ते हिंदुविरोधी आणि इस्‍कॉनविरोधी घोषणाबाजी करू लागले. आम्‍ही त्‍यांना विरोध केला नाही. जेव्‍हा परिस्‍थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्‍हा आम्‍ही सैन्‍याला बोलावले. ते त्‍वरित आले. तसेच त्‍यांनी परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यात साहाय्‍य केले. दुपार होण्‍यापूर्वीच मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्‍यात आले होते; मात्र हिंसाचार करणारे विनाकारण तेथे पोचले आणि आक्रमण केले.

३. येथील पोलीस ठाण्‍याचे प्रमुख अब्‍दुल करीम यांनी सांगितले की, हिंसाचार करणार्‍यांनी मंदिरांची हानी करण्‍याचा प्रयत्न केला; मात्र मंदिरांची खूप हानी झाली नाही, असा दावा त्‍यांनी केला.

संपादकीय भूमिका

‘बांगलादेशात हिंदू सुरक्षित आहेत’ म्‍हणणारा बांगलादेश यावर तोंड उडणार नाही !