श्रीनगर – पोलिसांनी आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील ५० हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या. यांपैकी एकट्या कठुआ जिल्ह्यात १७ ठिकाणी धाडी टाकून आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या १० जणांना अटक करण्यात आली आहे. (काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे तेथील लोकांचा आतंकवाद्यांना असलेला पाठिंबा आणि त्यांना करत असलेले साहाय्य होय ! त्यामुळे आतंकवाद्यांच्या समर्थकांवर कारवाई केली, तरच काश्मीरमधील आतंकवाद काही प्रमाणात थांबेल ! – संपादक) त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
जम्मू विभागाचे साहाय्यक महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, पोलिसांनी आतंकवाद्यांना पाठिंबा देणार्या अनेक संशयितांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांकडून तळ उभारले जाईपर्यंत पोलीस काय करत होते ? |